शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

भादवडला जलशुद्धीकरण संयंत्र युनिट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खांडबारा : नवापूर तालुक्यातील भादवड येथे गावठाण परिसरात नर्मदा जल सेवा या जलशुद्धी करण संयंत्र युनिटचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : नवापूर तालुक्यातील भादवड येथे गावठाण परिसरात नर्मदा जल सेवा या जलशुद्धी करण संयंत्र युनिटचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आदर्श गांव संकल्प व प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडले. या सभारंभाला कृषी सहसंचालक अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, सामाजिक दायित्व कंपनीचे प्रतिनिधी व पिरामल सर्वजलचे व्यवस्थापक विनय मेनन, पिरामलचे राज्यस्तरीय अधिकारी अश्वजित ढोके, पिरामलचे विभागीय व्यवस्थापक दीपक कळंकर, जिल्हा प्रकल्प अधिकारी भावेश वाघमारे, नवापूर तालुक्याचे गट विकास अधिकारी वर्षा फडोळ, सहाय्यक गट विकास अधिकारी बी.डी. गोसावी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल रंगारी, अभियान सहयोगी ख्याती मेनङिास, जिल्हा कार्यकारी अधिकारी योगिनी खानोलकर, बायफ संस्थेचे दुधाळे, सरपंच संजय वळवी, सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, तलाठी आणि मुख्यमंत्री ग्राम विकास प्रवर्तक अविनाश पाटील आदी उपस्थित होते.पोपटराव पवार व सहका:यांचे गावात आगमन होताच लेझीम व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत म्हटले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रतिभा वळवी यांनी केले. याप्रसंगी पोपटराव पवार व विनय मेनन यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्वजित ढोके तर आभार अविनाश पाटील यांनी मानले.उद्घाटनाप्रसंगी पवार यांनी शुद्ध पाणी पिण्याचे महत्व सांगितले व नर्मदा जल सेवेच्या माध्यमातून मिळणारे पाणी अल्पशा दराने गावाला मिळेल. तसेच महिला बचत गटास रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे ग्रामस्थांचे आरोग्यही सुदृढ राहिल असा विश्वास व्यक्त केला. बचत गटाच्या महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले असून, चांगले आरोग्य राखण्यासाठी गावातील लोकांनी शुद्ध पाणी विकत घ्यावे असे, आवाहन ग्रामस्थांना केले.सामाजिक दायित्व या प्रेरणेने पिरामल प्रतिष्ठान अहमदाबाद हे आरोग्य, पिण्याचे पाणी व शिक्षण या निर्देशांकावर कार्यरत आहे. सध्या भारतातील 21 राज्य आणि महाराष्ट्रातील अमरावती, बुलढाणा व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये प्रतिष्ठानचे मानवी निर्देशांक उंचविण्याचे निरंतर कार्य सुरू आहे.भादवडला पिरामल सर्वजलमार्फत महाराष्ट्रातील पहिला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प हा राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पिरामल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा व दिव्या स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या सहाय्याने नर्मदा जल सेवा हे जल शुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित करण्यात आले. प्रारंभी 15 रूपये प्रति जार दराने शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. या युनिटच्या उभारणीतून महिला बचत गटाच्या 20 महिलांना रोजगार प्राप्त होणार आहे.कार्यक्रमासाठी जि.प.प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व मुख्याध्यापक, बचत गट प्रमुख प्रतिभा वळवी, ग्रामस्थ व युवक-युवती मंडळासह वीज वितरण कंपनीने परिश्रम घेतले.