लोकमत न्यूज नेटवर्कुलहान शहादा : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना लहान शहादा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.प्रकाशा येथील योगेश रोहिदास पाटील नंदुरबारहुन शहादयाकडे येत असताना लहान शहादा जवळ रस्त्याच्या बाजूला त्याच्या मित्र जवळ चर्चा करत होते. यावेळी मागून आलेल्या कारने दुचाकीला ठोस दिली त्यात योगेश जखमी झाला असून त्याच्या पायाला तीन ठिकाणी फॅक्चर झाले आहे.नंदूरबार कडून शहादा कडे जाणाऱ्या कारने (एमएच.०२, डी.जे. ५८५९) या गाडीने मागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या योगेश च्या मोटर सायकल (क्रमांक एमएच ३९, एल ७४९५) ला जोरदार धडक दिली त्यात योगेश खाली पडल्यानंतर जखमी झाला. अपघातानंतर कारचालक तेथून पसार झाला. तेथे उपस्थित एकाने कारचा फोटो काढल्याने कारचा नंबर कळू शकला.लहान शहादा आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर शहादा येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भरधाव कारची उभ्या दुचाकीला धडक, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:06 IST