समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जि. प. च्या अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, माजी आमदार ॲड. पद्माकर वळवी, जि. प. चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, जि. प. सदस्य भारतीबाई भिल, पं. स. सदस्य जंग्या भिल, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष किशोर मुरार चौधरी, ग्रा.पं. सदस्य दिलीप ज्ञानदेव पाटील, रफीक खाटीक, महेंद्र भोई, प्रेरणा संस्थेचे संचालक अरुण मोरे, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, नंदकिशोर पाटील, पंडित धनराळे, छोटू सामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी भजनी मंडळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ॲड. सीमा वळवी म्हणाल्या की, भजन स्पर्धेमुळे धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण होते. अशा भक्तिमय वातावरणात चांगले संस्कार मिळतात. भजनी मंडळाच्या कलावंतांनी जर प्रस्ताव पाठविले तर मानधनासाठी असलेल्या योजनेतून त्यांना लाभ मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी जंग्या सोनवणे, किसन ठाकरे, किशोर माळीच,, ब्रिजलाल पाडवी, उद्धव पाडवी, गजानन ठाकरे, शांतीलाल ठाकरे, अशोक माळीच, कैलास पाडवी, रमण भिल, रवींद्र माळी, धरम महाराज आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले.
प्रकाशा येथे भजन सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:31 AM