शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

वाहतूक बंद असल्याने पायपीट नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व ...

वाहतूक बंद असल्याने पायपीट

नंदुरबार जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत लॅाकडाऊन लागू करण्यात आले असल्याने आठवड्यातील चार दिवस जनता कर्फ्यू व तीन दिवस अत्यावश्यक सेवा चालू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बससेवा व खासगी वाहने बंद असल्याने स्थलांतरीत कामगारांना गावी परतण्यासाठी वाहने उपलब्ध होत नसल्याने पायपीट करावी लागत आहे.

गेल्या वर्षी अचानक लॅाकडाऊन जाहीर करण्यात आल्याने स्थलांतरीत कामगारांच्या मनात यंदा धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या हालचाली लक्षात घेऊन स्थलांतरीत कामगारांचे गावाकडे पलायन सुरू झाले आहे.

गेल्या वर्षाचे अनुभव वाईट

गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने कामगारांना १५० ते २०० किलोमीटर दिवस रात्र चालत गावी यावे लागले होते. त्यामुळे गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होऊन नये. म्हणून कामगार मिळेल, तशी व्यवस्था करून गावाकडे परत निघत आहेत.

गेल्या वर्षातील लॉकडाऊनच्या भीतीपोटी आम्ही गावी निघून आलो. अर्धवट काम सोडून गावी आलो. मालकांनी कामाचे पैसेही पूर्ण दिले नाहीत. काम झाल्यावर पैसे मिळणार असे वारंवार सांगितले आहे. कुटुंबाला सुरत येथून घेऊन आलो आहे. सध्या जंगलात जाऊन महू गोळा करत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

- किसन गावित, कामगार, विसरवाडी

सुरत येथे आम्ही गवंडी कामासाठी गेलो. महाराष्ट्रीयन मजूर असल्याने वेगळी वागणूक दिली जाते. तुमच्या महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. तुमच्यापासून भीती वाटते. काम बंद करून गावी जा, असे सांगितल्याने आम्ही गावी आलो.

- विनायक गावित, मजूर, चिंचपाडा

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन होऊ शकते. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. म्हणून लाॅकडाऊन लागण्याच्या आधीच गावी आलो आहोत.

अमृत वळवी, मजूर, विसरवाडी