शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी घेवून भिंत पाडण्याचा प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खाजगी कॉम्पलेक्ससाठी बसस्थानकाची भिंत पाडण्याच्या प्रकारातून कथीत खासदार महिला आणि तिच्या साथीदारांकडे दोन पिस्तुल, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खाजगी कॉम्पलेक्ससाठी बसस्थानकाची भिंत पाडण्याच्या प्रकारातून कथीत खासदार महिला आणि तिच्या साथीदारांकडे दोन पिस्तुल, एक मॅगेङिान आणि 25 जिवंत काडतूस सापडल्याची खळबळजनक घटना नंदुरबारात शनिवारी पहाटे घडली. दरम्यान, 20 लाखांच्या बदल्यात रमेश चौधरी यांनी हे काम दिल्याची कबुली महिलेने दिली आहे. नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.रमेश बाबुलाल चौधरी, रा.नंदुरबार, बबीता वर्मा, रा.अंधेरी, मुंबई, विजय किसन देवरे, रा.खोरदड, ता.धुळे, अजित चंद्रकांत देसले, रा.वलवाडी, ता.धुळे, वाल्मिक श्रीधर दराडे, रा.नाशिक यांच्यासह भिंत पाडण्याचे काम करणारे जंगलू पाडवी, प्रकाश पाडवी, दादू भिल, जयू भिल, रवींद्र पाडवी सर्व रा.नळवा, ता.नंदुरबार अशी संशयीतांची नावे आहेत. रमेश चौधरी फरार असून इतर सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबार बसस्थानकाला लागून साईप्लाझा कॉम्पलेक्स आहे. राज्य परिवहन विभाग आणि या कॉम्पलेक्सचे मालक यांच्यात वाद आहे. परिवहन विभाग भिंत तोडण्यास मनाई करीत आहे. यावरून न्यायालयीन वादही झाले आहेत. यातूनच तथाकथीत महिला आणि तिच्या साथीदारांनी शनिवारी पहाटे भिंत तोडण्याचा प्रकार केला. ही बाब आगाराचे प्रमुख मनोज पवार यांना दिसली. त्यांनी संबधीतांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलेने आपण खासदार असून इतरांनी पोलीस व अंगरक्षक असल्याची बतावणी केली. पवार यांनी वरिष्ठांना ही बाब सांगितली. पवार यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संबधीतांना विचारणा केली. पोलिसांशीही त्यांनी हुज्जत घातली. सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल, नऊ मॅगेङिान, 25 काडतूस जप्त करण्यात आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी साई प्लाझाचे मालक रमेश चौधरी यांनी 20 लाख रुपये देवून हे काम सोपविल्याचे सांगितले. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसात रमेश चौधरी यांच्यासह कथीत महिलेसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तथाकथीत महिला कोण, तिचे साथीदार कोण, नंदुरबारात येवून अनधिकृतरित्या भिंत पाडण्याचे कारण काय? यासह इतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. ही कारवाई फौजदार चौधरी, सोनवणे, हवालदार अरुण सैंदाणे, रवींद्र पवार, अमोल पवार, सुनील येलवे, रामेश्वर चव्हाण, अनील बडे, उत्तम अहिरे, रोहिणी धनगर, इंदिरा वळवी यांनी केली. तपास पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर करीत आहे.