शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईच्या ताटात बेस्ट बिफोरचे स्टीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एफएसएसएआय अर्थात फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडडर्स अथाॅरीटी  ऑफ इंडियाने देशात मिष्ठान्न किंवा मिठाईबाबत नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एफएसएसएआय अर्थात फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडडर्स अथाॅरीटी  ऑफ इंडियाने देशात मिष्ठान्न किंवा मिठाईबाबत नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार नंदुरबार शहरातील बहुतांश मिठाई विक्रेते काम करत असून कोणती मिठाई किती दिवस टिकेल याची माहिती थेट काऊंटरवर लिहून ठेवली जात आहे. लोकमतने एफएसएसएआयने घोषित केलेल्या नियमावलीनुसार शहरातील पाच दुकानांमध्ये चाैकशी करुन माहिती घेतली असता, दुकानदार आणि ग्राहक यांना याची माहिती असल्याचे समोर आले. मावा, रवा, लिक्विड मिष्ठान्न तसेच बेसन पीठापासून तयार प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर एक चकती ठेवून बेस्ट बिफोर अर्थात मिठाई किती दिवस टिकून राहणार राहिल याची माहिती देत आहेत.  दोन ते चार दिवस टिकणारी मिठाई योग्य असल्याने तिच खावी असा आग्रहही करत आहेत. दिवाळीपर्यंत सर्वच ठिकाणी स्टीकर दिसणार दरम्यान शहरातील वातावरणानुसार रबडी, बासुंदी असे दुग्धजन्य द्रव मिठाई, श्रीखंड, रसमलाई असे प्रकार साधारण २४ तास, मावा मिठाई, पेढा आदी मिठाई दोन दिवस तर बेसनपीठापासून तयार होणारी मिठाई पाच दिवसांपेक्षा अधिक काळ टिकत नसल्याने त्या अनुषंगाने लागेल तेवढी मिठाई विक्री करत असल्याची माहिती देण्यात आली. मिठाई घेण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांसोबत चर्चा केली असता, शासनाने काढलेला नियम चांगला असून यातून दूषित किंवा खराब मिठाईमुळे होणारा त्रास कमी होणार असल्याचे सांगितले. ग्राहकांना या प्रकाराची माहिती नसल्यास मिठाई विक्रेते माहिती करुन देत असल्याचेही यावेळी दिसून आले. दरम्यान शहरातील सर्व छोट्यामोठ्या दुकानांमध्ये दिवाळीपर्यंत मिठाईवर स्टीकर ठेवूनच व्यवसाय करणार असल्याची माहिती देण्यात आली. काही दुकानात मात्र स्टीकर ठेवण्यात आलेले नसल्याने त्याठिकाणी कारवाई करण्याची गरज आहे. विक्रेत्यांची बैठक शहरातील सुभाष चाैक, नेहरू चाैक, गिरीविहार, सीबी पेट्रोलियम येथील पाच मिठाई विक्रीच्या दुकानांना भेटी दिल्या असता, ४ ऑक्टोबरपासून बेस्ट बिफोर असे स्टीकर मिठाईवर लावले जात असल्याचे सांगण्यात आले. शहरातील मिठाई व्रिक्रेता संघटनेने यापूर्वी बैठक घेवून सर्वांना सूचित केल्याची माहिती देण्यात आली. उर्वरीत विक्रेते अंमलबजावणी करत असल्याचे सांगण्यात आले.  शहरातील सर्व विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मिठाईवर ती किती दिवस टिकू शकेल याची माहिती देणारे स्टीकर लावले आहे. ग्राहकांनाही माहिती देत आहोत. नियमांचे पालन करण्यावर भर राहिल. -पप्पूजी अग्रवाल, मिठाई व्रिक्रेते, नंदुरबार.