शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लंगडीभवानी येथील लाभार्थीने लावली ग्रामसेवकाच्या कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घरकुलांच्या पैशांच्या वादातून ग्रामसेवकास एकाने कानशिलात लगावल्याची घटना लंगडीभवानी, ता.शहादा येथे घडली. शहादा पोलिसात एकाविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वातंत्र्य दिनानिमित्त लंगडीभवानीचे ग्रामसेवक विरसिंग मनोहर पावरा हे ग्रामपंचायत कार्यालयात थांबले होते. त्या ठिकाणी गावातीलच सत्तरा शिका:या पावरा हे आले, त्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : घरकुलांच्या पैशांच्या वादातून ग्रामसेवकास एकाने कानशिलात लगावल्याची घटना लंगडीभवानी, ता.शहादा येथे घडली. शहादा पोलिसात एकाविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वातंत्र्य दिनानिमित्त लंगडीभवानीचे ग्रामसेवक विरसिंग मनोहर पावरा हे ग्रामपंचायत कार्यालयात थांबले होते. त्या ठिकाणी गावातीलच सत्तरा शिका:या पावरा हे आले, त्यांच्या घरकुलाचा हप्ता बाकी होता. तो मिळावा म्हणून त्यांनी गेल्या ंनेक दिवसांपासून ग्रामसेवक पावरा यांच्या मागे तगादा लावला होता. परंतु घरकुलाचा हप्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी ग्रामसेवकाला याबाबत विचारले असता त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. सत्तरा पावरा यांनी थेट ग्रामसेवकाच्या कानशिलात लगावली. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली. काहींनी मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रय} केला.याबाबत विरसिंग मनोहर पावरा यांनी फिर्याद दिल्याने सत्तरा पावरा यांच्याविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार शिंदे करीत          आहे.