शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इच्छागव्हाण येथे अस्वलाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:36 IST

महिलेवर हल्ला : जागीच मृत्यू, वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

तळोदा : जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाने हल्ला चढवत तिचे पोटाचे लचके तोडले. यात महिला गंभीर जखमी झाल्यामुळे जागेवरच तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील इच्छागव्हाणच्या गोंडापाडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा मोठा वावर वाढल्यामुळे वनविभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पोलीस सूत्रानुसार तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण जवळील गोैडाटेंभापाडा येथील जानुबाई सत्या तडवी (65) ही महिला रोज आपल्या मालकीच्या शेळ्या जवळच्या डोंगरावरील जंगलात चारायला नेत असते. नेहमी प्रमाणे तिने शुक्रवारी नऊ वाजेच्या सुमारास जंगलात चारायला नेल्या होत्या. ती शेळ्यांच्या मागे उभे असतांना दबा धरून बसलेल्या अस्वलाने तिच्या मागून थेट हल्ला चढविला. महिलेने अस्वलाचा प्रतिकारदेखील केला. मात्र भरभक्कम असलेल्या अस्वलाने तिच्या पोटाचे, पायाचे लचके घेत पोटच झाडले होते. यात अतिरक्त श्राव झाल्यामुळे ती जागीच गत प्राण झाली. तत्पूर्वी तिच्या आरडाओरडामुळे आजू-बाजूचे मजूर तेथे धावून आले. त्यांनी अस्वलावर दगडफेक केल्यानंतर अस्वलाला तेथून पळवून लावले. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते. मयत महिलेचे तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत महिलेचा मुलगा सायसिंग सत्या तडवी (वय 38) रा.इच्छागव्हाणचा गौंडापाडा याने पोलिसात खबर दिली. त्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान अक्कलकुवा विभागाचे वनक्षेत्रपाल सोनाली गिरी यांना माहिती मिळताच ते पथकासह दाखल झाले. आता पुढील आर्थिक मदतीसाठी कार्यवाही करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.