शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

समस्या जाणून घेण्यासाठी केला पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव आणि अक्राणी परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी वरिष्ठ अधिका:यांसह 20 किलोमीटर पायी प्रवास केला. दरम्यान, समस्या जाणून घेतल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिका:यांनी संबंधित अधिका:यांना दिल्या.जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, तहसीलदार राजेश थोटे, तालुका कृषी अधिकारी बापू गावीत आदी होते.नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावाकडे जाणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तयार केलेल्या रस्त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्याने जिल्हाधिका:यांनी धडगावपासून अचपार्पयत वाहनाने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवास पायी करून जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. अचपा ते तिनसमाळ असे 20 किलोमीटरचा त्यांनी अधिका:यांसह पायी प्रवास केला. तिनसमाळ येथे पलासपाणीपाडा, पाटीलपाडा, दुकानपाडा, डुठ्ठलपाडा व गुडानपाडा येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून त्यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिका:यांना दिल्या. त्यांनी ग्रामस्थांशी व त्यांच्या मुलांशी आस्थेवाईकपणे चर्चा केली. गावाच्या विकासाबाबत चर्चा केल्यानंतर आचपार्पयतचा परतीचा प्रवासदेखील पायीच झाला. स्वत: जिल्हाधिकारी पायी चालत भेट देण्यासाठी आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पाडय़ावरील  नागरिक तानाजी पावरा, वसंत पावरा, रेहंडय़ा पावरा, जितेंद्र पावरा, लालदास पावरा, फाडा पावरा व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिका:यांना गावातील समस्यांविषयी माहिती दिली.