शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

आदेशाविना सोडले जातेय शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 11:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने बंद करून पाणी अडवण्याचे आदेश असतानाही रात्री-अपरात्री दरवाजे उघडून पाणी सोडण्याचे प्रकार सुरू आहेत़ यामुळे साठलेले पाणी वाहून जात असून शेतक:यांच्या पिकांना पाणी मिळत नाही़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची रितसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांनी ...

ठळक मुद्देआर्थिक व्यवहारांचा आरोप रात्री कोणत्याही प्रकारचे आदेश नसताना पाणी सोडण्याचा हा प्रकार आर्थिक देवाण-घेवाणीतून होत असल्याचा आरोप शेतक:यांनी निवेदनाद्वारे केला आह़े या भागातील व्यावासायिकाला या पाण्याचा सर्वार्थाने उपयोग होण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजचे दरवाजे पूर्ण क्षमतेने बंद करून पाणी अडवण्याचे आदेश असतानाही रात्री-अपरात्री दरवाजे उघडून पाणी सोडण्याचे प्रकार सुरू आहेत़ यामुळे साठलेले पाणी वाहून जात असून शेतक:यांच्या पिकांना पाणी मिळत नाही़ गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची रितसर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतक:यांनी निवेदनाद्वारे केली आह़े सोमवारी हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांना देऊन शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा केली़ या निवेदनात शेतक:यांनी म्हटले आहे की, आठ दिवसांपूर्वी प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणी अडवले गेल़े परंतू गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रात्री बॅरेजचे दरवाजे उघडून साठा केलेले पाणी सोडून देण्यात येत आह़े ऐन खरीप हंगामात अडवलेले पाणी सोडून देण्यात येत असल्याने दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ या भागातील बागायतदार क्षेत्रासाठी हे पाणी महत्त्वपूर्ण आह़े रात्री पाणी सोडून देण्यात येत असल्याने शेतक:यांना पाणी उचलणे अशक्य होत आह़े बॅरेजचे पाणी सोडण्यासाठी  तांत्रिक परवानगी आणि आदेश गरजेचे असतानाही पाणी सोडण्याचा प्रकार नेमका कोणासाठी होत आह़े याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आह़े तसेच बॅरेजचे संपूर्ण दरवाजे बंद करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतक:यांनी केली आह़े यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, प्रकाशा विकासोचे चेअरमन हरी दत्तू पाटील, राजेंद्र लिमजी चौधरी, अंबालाल नारायण चौधरी, मुकेश नगीन पाटील, गोपाळ चौधरी, तुकाराम परशुराम पाटील यांच्यासह प्रकाशा परिसरातील शेतकरी उपस्थित होत़े