शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा काठावरील गावांमध्ये बार्जद्वारे गस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सरदार सरोवरच्या पाणलोट क्षेत्र अंतर्गत नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये बार्जच्या सहाय्याने पोलिसांचे विशेष गस्ती पथक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सरदार सरोवरच्या पाणलोट क्षेत्र अंतर्गत नर्मदा नदीकाठच्या गावांमध्ये बार्जच्या सहाय्याने पोलिसांचे विशेष गस्ती पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात हे पथक कार्यरत असणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिलीजिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गावे ही नर्मदा नदीच्या काठावर वसलेली आहे. त्याचप्रमाणे हा भाग मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांच्या सीमेलगत आहे. कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या आदेशान्वये लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये परजिल्ह्यातील नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यात प्रवेशास मनाई करण्यात आली असल्याने या भागात हे पथक तैनात करण्यात आले आहे.शेजारच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात नंदुरबार शहर वगळता इतरत्र कोठेही कोरोना संक्रमित रुग्ण नसल्याने सर्वत्र विशेष खबरदारी बाळगली जात आहे. जिल्ह्याच्या सीमा सीलबंद करण्यात आल्या असून सर्वत्र विशेष सीमा तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील अनेक गावे या दोन राज्यांच्या सीमेलगत असल्याने या भागातून गुजरात व मध्य प्रदेशातील नागरिकांनी महाराष्ट्रात व नंदुरबार जिल्ह्यात अवैधरीत्या प्रवेश घेऊ नये यासाठी नर्मदा काठावर विशेष बार्ज तैनात करण्यात आली आहे. या बार्जवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धडगाव पोलिसांचे विशेष सीमा तपासणी पथक कार्यरत असणार आहे. दरम्यान, नर्मदा नदीकाठच्या भूषा पॉर्इंट या अतिदुर्गम भागातील गावात वैद्यकीय विभागामार्फत विशेष तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नर्मदा नदीद्वारे या भागाकडे येणाºया गावकऱ्यांची या विशेष केंद्रात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.