शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बांद्रीयाबड परिसरात दुसरा बिबट्याही जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : खेतियापासून काही अंतरावरील बांद्रीयाबड व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार होता. ग्रामस्थांनी या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : खेतियापासून काही अंतरावरील बांद्रीयाबड व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा संचार होता. ग्रामस्थांनी या बिबट्याला पकडण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. वनविभागाचे जोरदार शोधमोहीम राबवत या बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले. आठवडाभरात वनविभागाने दुसरा बिबट्या पकडला आहे.बांद्रीयाबड, ता.पानसेमल हे मध्य प्रदेश व महाराष्ट्र सिमेवरील गाव आहे. या परिसरात बिबट्यांचा संचार असून नागरिकांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने खरगोन, ता.शहादा रस्त्याच्या परिसरात कांतीलाल वेस्ता यांच्या शेताजवळ पिंजरा लावला. या पिंजºयात बिबट्या सकाळच्या सुमारास कैद झाला. परिसरात दोन बिबटे होते एक पकडला तर दुसºयाने तेथून पळ काढला होता. परंतु दुसºयाच दिवशी पुन्हा हा बिबट्या तेथे आला असता तो पिंजरयात कैद झाला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे त्या परिसरात नजर ठेवून बसले होते. त्यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी सकाळच्या सुमारास पिंजºयात बिबट्याला अडकलेला पाहिले. कैद झालेला बिबट्याला इंदूर येथील चिडियाघर (प्राणी संग्रहालय) येथे घेऊन जाणार असल्याचे वनविभागातर्फे सांगण्यात आले. सेंधवा वनविभागाचे अधिकारी श्रीराम मेहता, विजय गुप्ता, पानसेमल वनमंडळ अधिकारी मंगेश बुंदेला, खेतियाचे वनपरिक्षेत्र सहायक राजू पाटील, वनविभागाचे कर्मचारी राजा मौर्य, बाबूलाल मौर्य, प्रमोद गुर्जर, महेश तोमर, निलेश पाटील, मनोहर निगवाल, संतोष आलोने, जितेंद्र मुवेल उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून बांद्रीयाबड व परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यामुळे बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला केली होती. वनविभागाने सतर्क राहून आठवडाभरात दोन बिबटे कैद केल्याने नागरिकांमधील भीतची वातावरण दूर होण्यास मदत झाली आहे.