लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : परतीच्या पावसाने तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर केळीसह इतर पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतक:यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आह़े शुक्रवारी ठिकठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाल़े यात मोहिदा शिवारात जुने सिलींगपूर रस्त्यावर मगन दत्तू शिंदे यांच्या शेतातील केळीची 500 झाडे वादळीवा:यात जमिनदोस्त झाली़ यामुळे शिंदे यांचे साडेतीन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आह़े या भागात केळी, पपई, कापूस, ऊस, ज्वारी, मका या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आह़े नुकसानीची दखल घेऊन तालुका प्रशासनाने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े मोहिदा, कळमसरे, सिलींगपूर, धनपूरसह विविध भागात पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसात पावसामुळे नुकसान होऊनही कृषी विभागाने लक्ष दिलेले नाही़ शेतक:यांनी पंचनामे करण्याबाबत कृषी आणि महसूल विभागाकडे अर्ज देऊन पाठपुरावाही केला होता़ मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही़
परतीच्या पावसाने केळीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:50 IST