शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा बॅक वॉटरमध्ये डुंगी उलटून बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:43 IST

तळोदा : नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून डुंगीने (लाकडी ओंडका) जात असतांना दोन मुली बुडाल्या. पैकी एकीला वाचविण्यात यश आले ...

तळोदा : नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून डुंगीने (लाकडी ओंडका) जात असतांना दोन मुली बुडाल्या. पैकी एकीला वाचविण्यात यश आले आहे. साव:या दिगर, ता.धडगाव येथे 19 रोजी सकाळी ही घटना घडली. पलिकडच्या गावात किराणा दुकानात डुंगीने या बालिका जात होत्या. दरम्यान, या गावाला जाण्यासाठी कोटय़ावधी खर्चाचा रस्ता व पूल मंजुर असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.सपना वाद:या पावरा (12) रा.साव:या दिगर असे मयत मुलीचे नाव आहे. ती जीवन शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती. तर मोगी वकल्या पावरा (सात वर्ष) असे वाचविण्यात आलेल्या बालिकेचे नाव आहे.सरदार सरोवर प्रकल्पातील साव:या दिगर गाव हे बुडीतात येते. त्याला बेटाचे स्वरूप आले आहे. पलिकडच्या गावात जाण्यासाठी गावक:यांना लाकडाच्या ओंडक्यापासून तयार केलेल्या डुंगीने पाण्यातून जावे लागते. सपना पावरा व  मोगी पावरा या दोन मुली सोमवारी सकाळी पलिकडच्या गावात किराणा दुकानात जाण्यासाठी डुंगीने निघाल्या होत्या. खोल पाण्यात आल्या असत्या अचानक त्यांच्या डुंगीने हेलकावे घेतल्याने दोघे त्यात बुडाल्या. सपना ही खोल पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला तर मोगीला वाचविण्यात गावक:यांना यश आले.नर्मदा आंदोलनाचा आरोपटापू क्षेत्रासाठी नेमलेल्या भिंगारे समितीने 2004-05 मध्ये साव:या दिगर या गावासाठी रस्ता बनवून दिल्यास पुनर्वसनाची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोटय़ावधी खर्चाचा रस्ता व पूल मंजुर करण्यात आला आहे.  नर्मदा आंदोलनाने वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. गेल्या वर्षी भूषा येथे नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे डॉ. अफरोज अहमद आले असता नर्मदा आंदोलनाने त्यांचेकडे तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला मार्च 2018 पयर्ंत काम पूर्ण करण्यासंदर्भात आदेश देवून कारवाईचाही इशारा दिला होता. परंतू रस्त्याचे काम आजही बंदच आहे. रस्ता पूर्ण होईपयर्ंत  दळणवळणासाठी मोफत बोट उपलब्ध करून देण्याच्या सुचनेकडीही दुर्लक्ष झाले आहे. ही बोटही नियमित स्वरूपात राहत नाही. या सर्व समस्येमुळेच आज नाहक एका निरागस बालिकेला जीव गमवावा लागल्याचा आरोपही नर्मदा आंदोलनाने केला आहे.