शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संपाच्या पाश्र्वभूमीवर नंदुरबारातील सर्व एटीएममध्ये कॅश भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:56 IST

उपाययोजना : जिल्ह्यातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 12 राष्ट्रीयकृत बँकांच्या 63 शाखांमधील कर्मचारी दोन दिवसीय संपात सहभागी होणार आहेत़ संपाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा अग्रणी बँकेकडून सर्व शाखांच्या एटीएममध्ये कॅशचा भरणा करण्यात आला आह़े जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांचे 63 एटीएम सध्या सुरू आहेत़ इंडियन बँक्स असोसिएशन या संस्थेकडून देशातील बँकांच्या कर्मचा:याच्या वेतनश्रेणीत 2 टक्क्याने वाढ करणे प्रस्तावित होत़े या प्रस्तावाचा अधिकारी व कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवत संपाची घोषणा केली आह़े यानुसार 30 आणि 31 मे रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन या प्रमुख संघटनेकडून संपाचे संचलन करण्यात येणार आह़े दोन दिवस बँका बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी नंदुरबारसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बँकांमध्ये गर्दी दिसून आली़ नागरिकांनी मोठय़ा रकमा काढण्यासह भरणा करण्याचे व्यवहार पूर्ण केले होत़े सायंकाळी साडेपाच वाजेर्पयत सर्वच ठिकाणी गर्दी कायम असल्याने वेळ संपूनही बँकांच्या प्रशासनाने कामे पूर्ण केल्याची माहिती देण्यात आली आह़े या संपात केवळ राष्ट्रीयकृत बँकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील इतर खाजगी आणि सहकारी बँक या संपाबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आह़े खाजगी बँकांचा संपात समावेश नसला तरी दैनंदिन कॅश पुरवठा स्टेट बँकेतून करण्यात येतो़ त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यात भारतीय स्टेट बँकेच्या 12, देना बँकेच्या तीन, बँक ऑफ बडोदाच्या सहा, बँक ऑफ इंडियाच्या दोन, सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कॅनरा बँक यासह विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या 63 शाखा आहेत़ या शाखांनी लावलेल्या एटीएममध्ये दोन दिवसात 40 कोटी रूपयांर्पयतचा भरणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े एटीएममध्ये कॅश भरणा करून ग्राहकांची गैरसोय होऊ देणार नसल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारोट यांनी दिली आह़े कॅश संपल्यानंतर पुन्हा भरणा करण्याची तयारी लीड बँकेकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े