शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाच्या विभागांचीच बैठकीकडे पाठ, पदाधिकारी झाले नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 13:07 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प, वनविभाग ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प, वनविभाग व वीज वितरण या तीन यंत्रणांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. पुन्हा त्यांना नोटिसा बजावण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यांच्या सततच्या गैरहजेरीचा मुद्दा डीपीडीसीच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

तळोदा पंचायत समितीची बैठक गुरुवारी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती यशवंत ठाकरे होते. सुरुवातीस बांधकाम, आरोग्य, पशूसंवर्धन, एस.टी. महामंडळ, कृषी, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, घरकुले अशा विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सदस्यांनी वनविभाग, आदिवासी विकास प्रकल्प व वीज वितरण विभागाचे प्रश्न उपस्थित केले होते. परंतु या तिन्ही यंत्रणांचा कोणीही अधिकारी अथवा प्रतिनिधी हजर नव्हता. त्यामुळे सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सभेचे पत्र दिले होते का? असा सवाल सभापतींनी प्रशासनास केला. तेव्हा यंत्रणांनी पत्र देण्यात आले होते तरीही नेहमीप्रमाणे या विभागांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा नोटिसा पाठवून खुलासा मागवण्याची सूचना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. वास्तविक या तिन्ही यंत्रणांकडे ग्रामीण भागातील जनतेच्या वैयक्तिक व सामूहिक प्रश्न असतात. ते प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते.  परंतु सदर विभाग हेतूत: गैरहजर राहतात, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा जिल्हा विकास नियोजनाच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे सभापतींनी सांगितले.प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक दिगंबर बोरसे यांनी केले. बैठकीला उपसभापती लताबाई वळवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, पंचायत समिती सदस्य विजय राणा, चंदनकुमार  पवार, सुमनबाई वळवी, सोनी पाडवी, तालुका कृषी अधिकारी  नरेंद्र पवार, पाणीपुरवठा विभागाचे जितेंद्र गिरसे, बांधकाम विभागाचे आर.बी. पवार, विस्तार अधिकारी आर.के. जाधव आदींसह इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

सदस्यांनी मांडल्या समस्यादुर्गम भागातील गावांमध्ये अधिकारी, कर्मचारीच पोहचत नसल्याची तक्रार सदस्याने केली होती. त्यामुळे शासनाच्या योजना त्यांना मिळत नाही. शिवाय त्यांचे कामेदेखील होत नाही. विशेषत: याठिकाणी लाभार्थींना आहारही मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने त्यांचा प्रतिनिधी न पाठवता स्वतः अधिकाऱ्यानेच उपस्थित राहण्याची सूचना सदस्यांनी मांडली होती. त्यावेळी हजर रहाण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे सूचित करण्यात आले. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अत्यंत जीर्ण झाल्याने नेहमी नादुरुस्त होतात. त्यामुळे रुग्णांनाही तातडीने उपचार मिळत नाही. रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा विजय राणा यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याची सूचना सभापतींनी केली होती.