शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 21 गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक संदर्भात जनजागृती मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देण्यासाठी  राज्यातील 25 जिल्ह्यांतील 850 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकांना बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल माहिती देण्यासाठी  राज्यातील 25 जिल्ह्यांतील 850 गावांची निवड करण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 21 गावाचा समावेश आहे.बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा28 नोव्हेंबरला संपणार आहे. या दरम्यान मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावा घेण्यात येणार आहे. विद्याथ्र्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभा यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच या अंतिम टप्प्यात ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जात आहेत. असे विवाह रोखण्यासाठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती देखील दिली जात आहे. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षिण देखील देण्यात आले. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 ऑगस्ट ला सुरु झाला. या टप्प्यात अगदी तळागाळातील गावक:यांना समस्यांची माहिती दिली व यासाठी ग्रामसभा भरविल्या गेल्या. अशा सभांमध्ये बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षण करण्यासंबंधीचे ठराव संमत केले. तर दुसरा टप्पा 11 ऑक्टोबरला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु झाला. यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले गेले. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका घेतल्या. तसेच बचतगट कार्यकत्र्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली. युनिसेफचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी झाले.