शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 72 ग्रा़पंची विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:48 IST

गंभीर : 31 डिसेंबर्पयत होती मुदत, केंद्रचालक व ग्रामसेवकांची चालढकल

नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण 595 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींकडून अद्याप ऑनलाईन पध्दतीने विकास आराखडा सादर करण्यात आलेले नाहीत़ संबंधित आराखडा सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2018 र्पयत अंतीम मुदत देण्यात आली होती़ संबंधित ग्रामपंचायतींनी लवकर आराखडा सादर करावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणा:या विविध निधींचे कशा प्रकारे विनियोग केला जाईल, कुठल्या कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल आदी विविध बाबींचा अहवाल ऑनलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी व नंतर जिल्हा परिषदेला सादर करावयाचे होत़े ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी वितरीत करण्यात येत असतो़ या निधीच्या खर्चाचेही तपशील ग्रामपंचातींनी ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ परंतु या आदेशाकडे जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींकडून सफशेल दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे यातून दिसून येत आह़े ग्रामपंचायतींना हा अहवाल सादर करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत देऊनही जवळपास सव्वा महिना झाल्यावरही हा अहवाल सादर करण्यात आला नाही़ अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक ग्रा़पं़चा समावेशदरम्यान, जिल्ह्यातील या 72 ग्रामपंचातींमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक 48 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े त्यानंतर धडगाव 20, शहादा 1 तर नवापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आह़े दरम्यान, प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानुसार बहुतेक ग्रामपंचातींना अहवाल सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आल़े संकेतस्थळावर लॉगिन न होणे, पासवर्ड चुकीचा असणे आदी अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागत असल्याचे सांगण्यात आल़े प्रशासकीय आकडेवारीनुसार आतार्पयत 523 ग्रामपंचायतींनी आपले विकास आराखडे सादर केले असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सांगण्यात आले आह़े ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये पारदर्शका निर्माण व्हावी, तसेच गावात कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च करण्यात येणार याची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामविकास आराखडय़ाचे सादरीकरण करणे आवश्यक आह़े परंतु तरीदेखील बहुतेक ग्रामपंचायतींकडून विकास आराखडा सादर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आह़े  ग्रामविकास आराखडा ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची जबाबदारी संबंधित केंद्रचालक व ग्रामसेवकांची आह़े परंतु त्यांच्याकडून अहवाल सादर करण्यास चालढकल करण्यात येत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधितांना पाठीशी न घालता लवकरात लवकर याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आह़े आराखडय़ांतर्गत, अंगणवाडी, आरोग्य, पाणी मुलभूत विषयांवर काम होणे गरजेचे असत़े