शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा पुलासाठी आता 30 ऑगस्टचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:51 IST

काम अंतीम टप्प्यात : पुढील महिन्यात पुलाचे उदघाटन होण्याची माहिती

ठळक मुद्दे भिल्लीस्थानतर्फे आंदोलनाचा इशारा 4भिल्लीस्थान टायगर सेनेतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हातोडा पुलाचे काम 15 ऑगस्टर्पयत पूर्ण करण्याची मागणी केली़ उदघाटन झाले नाही तर 16 रोजी संघटनेव्दारे ग्रामस्थांना घेऊन सर्व सामान्यांच्या हस्ते पुलाचे उदघ

लोकमत न्यूज नेटवर्कतळोद : तळोदा व धडगाव या दोन आदिवासी बहुल तालुक्यांना नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणाशी जोडणारा तसेच दोन्ही तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणा:या हातोडा पुलाचे काम 30 ऑगस्टर्पयत पूर्ण होणार आह़े अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील पिंगळे यांनी दिली आह़े या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आह़े याबाबत नुकतीच आमदार उदेसिंग पाडवी यांनी पुलाची पाहणी करुन आढावा   घेतला़ या पुलाचे बांधकामांची माहिती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अ़ेपी़ चौधरी, उप अभियंता सुनील पिंगळे यांनी सांगितले की, पुलाच्या रोलिंगचे काम आता बाकी असून ते जलद गतीने सुरु आह़े तसेच पुलाला जोडून रस्त्याचे डांबरीकरण व इतर कामे पाऊस सुरु असल्याने खोळंबली होती़ पण आता पाऊस थांबल्याने कामास जलद गतीने सुरुवात झाली आह़े 30 ऑगस्टर्पयत पुलाचे काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितल़े सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुलाचे उदघाटन होऊन हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली आह़े दरम्यान, पुलाचे काम पूर्ण होताच जास्त विलंब न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली़ तळोदा शहर व लगतच्या पसिराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषय ठरलेल्या या पुलाचे उदघाटन केव्हा होते या बाबत जनमानसामध्ये कमालीची उत्सुकता आह़े तसेच गेल्या आठवडय़ात अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्ग सदगव्हाण पुलाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे नाल्याला पाणी येऊन वाहतूक ठप्प झाल्यानंतर हा पुल कधी पूर्ण होतो़ याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आह़े रोज अनेक नागरिक उत्सुकतेपोटी पुलाचे किती काम झाले आहे किती बाकी आहे? हे पाहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ येत असतात़ हातोडा पुलाचे काम काही वर्षापुर्वी सुरु झाले होत़े त्याला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती़ मागे तापी नदीतील पाणीसाठय़ामुळे वेळोवेळी या पुलाचे काम लांबत गेले होत़े या पुलाचे नऊ पिलर्स व अकरा फाउंडेशन आहेत़ पुलाला 62.50 मीटर लांबीचे 10 स्लॅब असून नंदुबार शहराकडील 15 मीटर व तळोदा शहराकडून 35 मीटर लांबीचा हा पूल आह़े या पुलामुळे तळोदा-नंदुरबार हे अंतर केवळ 20 मिनीटांचे राहणार आह़े या पुलाचे मुदत 2011 मध्ये पूण असतानाही त्याला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली़ लवकरात लवकर वापरासाठी मार्ग खुला करावा 4गेल्या अनेक वर्षापासून हातोडा पुलाच्या उदघाटनाची वाट पाहण्यात येत आह़े परंतु काहीना काही कारणास्तव पुलाचे काम रखडत असून परिणामी वेळेची व पैशांची बचत करणा:या या पुलापासून नागरिकांना वंचित रहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े हातोडा पुलाचे काम 30 रोजीर्पयत जरी पुर्ण करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी तोवर काम पूर्ण होईल का असा प्रश्न विचारण्यात येत आह़े त्याच प्रमाणे काम पूर्ण झाल्यावरदेखील उदघाटन कार्यक्रम त्वरीत उरकावा अजून त्यासाठी वेळ लागू नये अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े