शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॅालेजच्या अंतिम मंजुरीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा  अर्थात नीट परीक्षेचा निकाल जाहीर होत असतांना देखील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा  अर्थात नीट परीक्षेचा निकाल जाहीर होत असतांना देखील नंदुरबारच्या मेडिकल कॅालेजच्या अंतीम मंजूरीसंदर्भात अद्याप काहीही हालचाल नसल्याची स्थिती आहे. कॅालेेज सुरू करण्यासंदर्भात सर्व तयारी झालेली असतांना केवळ एका परवाणगीसाठी सर्व अडून बसलेले आहे.  नंदुरबार मेडिकल कॅालेजला आवश्यक त्या सर्व परवाणग्या मिळालेल्या आहेत. केंद्र शासनाचा हिश्याचा निधी देखील मंजूर झालेला आहे. आजच कॅालेज सुरू होईल या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. परंतु केवळ केंद्राच्या अंतिम मंजुरीत हे कॅालेज अडकले आहे. शुक्रवारी नीट परीक्षेचा निकाल जाहीर होत असल्यामुळे प्रवेश प्रकिया देखील लागलीच सुरू होणार आहे. कॅालेज आताच सुरू झाले नाही तर पुन्हा वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महिनाभरापूर्वी आली  समितीनंदुरबार मेडिकल कॅालेजच्या अंतिम मंजूरीसाठी केंद्राची समिती महिनाभरापूर्वी दाखल झाली होती. समितीन आवश्यक त्या सर्व बाबींची पडताळणी केली. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक ते विभाग, इमारत, प्राध्यापकांची नियुक्ती, साधन सामुग्री आणि इतर इन्फास्ट्रक्चर पाहून समितीने समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे लागलीच अर्थात महिनाभराच्या आत अंतिम परवाणगी मिळेल अशी अपेक्षा लागून होती. परंतु समितीने अद्यापही आपल्या अहवालानुसार मंजुरीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे चित्र आहे. १०० विद्यार्थ्यांना प्रवेशपहिल्या वर्षी अर्थात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी अर्थातच राज्यावरून प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. कॅालेजला मंजुरी मिळाल्यास राज्यातील एमबीबीएसच्या प्रवेशाच्या जागा देखील वाढणार असल्याचे स्पष्टच आहे. त्यामुळे राज्य शासनाने देखील याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून यंदा कॅालेज सुरू कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

एका परवानगी अभावी अडकले कॅालेज...नंदुरबार मेडिकल कॅालेजला गेल्या दहा वर्षांपूर्वी परवानगी मिळाली होती. परंतु त्यावेळी आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ते नामंजूर करण्यात आले होते. त्यानंतर भाजप शासनाने पुन्हा कॅालेजची घोषणा केली. परंतु पाच वर्ष झाले अद्याप ते सुरू होऊ शकले नाही. आताच्या स्थितीत कॅालेज सुरू होऊ शकेल अशी स्थिती आहे. परंतु अंतिम मंजुरीच्या कचाट्यात ते अडकले आहे. केवळ एका परवानगीने आजच या कॅालेजमध्ये प्रवेश प्रक्रीया राबविण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदा हे कॅालेज कुठल्याही परिस्थीत सुरू व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.