शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक, सांस्कृतिक नाळ राष्ट्रीय पातळीवर जोडण्याचा प्रयत्न : चेतक फेस्टीवल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:43 IST

जयपालसिंह रावल यांचा संकल्प, पाच हजाराहून अधीक लोकांना मिळतोय रोजगार

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चेतक फेस्टीवल म्हणजे केवळ घोडय़ांचा बाजार नाही. तर या फेस्टीवलच्या माध्यमातून जिल्ह्याची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नाळ राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय पातळीवरील व्यवहाराशी जोडण्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना अनेक नवे उद्योग, व्यवसायाची दिशा देण्याचा प्रय} आहे. या शिवाय रोज पाच हजारापेक्षा अधीक बेरोजगारांच्या हाताला येथे काम मिळत असल्याचे प्रतिपादन या महोत्सवाचे संयोजक जयपालसिंह रावल यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले.  सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेचे निमित्त साधून गेल्या वर्षापासून येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे चेतक फेस्टीवलचे आयोजन केले जात आहे. यंदा या फेस्टीवलचे दुसरे वर्ष असून गेल्या चार दिवसांपूर्वीच पर्यटन मंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या फेस्टीवलमुळे सारंगखेडा गावाचे चित्रच सध्या पालटले आहे. सारंगखेडा बॅरेजमध्ये साठलेले अथांग पाणी आणि या काठालगतच उभारलेली टेण्ट सिटी लक्षवेधी ठरत आहे. घोडे बाजारातील चित्रच वेगळे आहे. देशभरातील विविध राज्यातील लोकं येथे एकत्र दिसून येत असून त्याला राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सवाचे स्वरूप आले आहे. विविध बोलीभाषा, पेहराव, विविध राज्यातील सांस्कृतिक ठेवा येथे पहायला मिळतो. दोन हजाराहून अधीक घोडे या ठिकाणी विक्रीसाठी आले आहेत. त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जात असून या बाजाराला एखाद्या नववधू प्रमाणे सजविण्यात आल्याने त्याचे रूप अधीकच देखणे झाले आहे. या पाश्र्वभुमीवर या फेस्टीवलचे संयोजक जयपालसिंह रावल यांनी सांगितले, ‘महिनाभर हा फेस्टीवल सुरू राहणार असून रोज नवनवीन आकर्षण पर्यटकांसाठी नियोजित केले आहे. या ठिकाणी रोज घोडय़ांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत. त्यात अश्वनृत्य, अश्वदौड, अश्व प्रदर्शन यासह अनेक स्पर्धा आहेत. खास करून लेमन रिंग राऊंड हा पर्यटकांसाठी अधीक लक्षवेधी ठरणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी देशभरातून खास 500 अश्व आले आहेत. त्यांची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. सुलतान हा घोडा खास आयोध्याहून येत असून या घोडय़ासाठी रोज दहाजण मॉलीश करतात. अश्व स्पर्धे बरोबरच विविध कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धाही आहेत. त्यात सारंगनृत्य स्पर्धा, व्हाईस ऑफ सारंगखेडा, हास्य कवी संमेलन, मिस अॅण्ड मिसेस सारंगी, चला हवा येवू द्या हा दूरदर्शन कलावतांचा कार्यक्रम, कव्वाली नाईट शिवाय स्थानिक कलावतांसाठी एक दिवस विशेष व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. लावणी महोत्सव हा सर्वात लक्षवेधी कार्यक्रम राहणार आहे. तीन दिवस तो सुरू राहणार आहे. या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील स्पर्धकांबरोबरच स्थानिक स्पर्धकही सहभागी होणार आहेत. पेटींग स्पर्धेत देशभरातून 17 राज्यातील स्पर्धकांनी पेटींग पाठविल्या आहेत. त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले असून अश्व प्रेमींसाठी ती एक मेजवानीच ठरली आहे. एकुणच हा महोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर त्यातून या भागातील कलाकार, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तरूण यांची नाळ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराशी जोडण्याचा हा सेतू आहे. यातून अनेकांचा व्यापार, व्यवसायाला कल्पकतेला व्यापकता मिळणार आहे. एरव्ही केवळ सात दिवस येथील यात्रा चालत होती. आपण पुढाकार घेवून त्याला स्थानिक स्ततरावर वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आता महाराष्ट्र शासनाचे पर्यटन विभाग जोडला गेल्याने त्याची व्यापकता वाढली आहे. ही या परिसरासाठी एक अनमोल भेट असून त्या माध्यमातून विविध क्षेत्रातील विकास साधण्याचे आपले उद्दीष्ट आहे. सुरवातीला अडथळेच अधीक येतात परंतु राज्याचे मुख्यमंत्री व पर्यटन विभागाने या फेस्टीवलकडे स्वत: लक्ष घातल्यामुळे दोन वर्षातच याला चांगले स्वरूप आले आहे. त्यामुळे परिसरातील सर्वानी या फेस्टीवलच्या माध्यमातून आपापल्या कला कौशल्य गुणाला चालना देवून विकासाची दिशा निश्चित करावी व त्यातून परिसराचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले.