शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:02 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने कुटूंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने कुटूंबासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला. आत्मदहन करणा-या कुटूंबावर तातडीने नियंत्रण मिळवता आल्याने अनुचित प्रकार टळला आहे. शनीमांडळ ता. नंदुरबार येथील अशोक मोतीराम पाटील यांचा ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून साडेचार लाख रूपयांचा दंड करण्यात आला होता. दरम्यान त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी दंड भरू शकणार नसल्याचे संबधित अधिका-यांना कळवले होते. परंतू कार्यालयाने सातत्याने तगादा लावल्याने अशोक पाटील हे त्रस्त झाले होते. त्यांनी सोमवारी पत्नी व मुलांसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल होत एका खोलीत कुटूंबिय व स्वत:ला बंद करुन घेतले होते. या खोलीत आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिल्यानंतर कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली होती. अधिका-यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेत अशोक पाटील याची समजूत काढत त्यांना बाहेर काढले होते. २०१९ पासून पाटील हे वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी कार्यालयात चकरा मारत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे. प्रकरणाच्या चाैकशीसाठी वाहन निरीक्षक गिरीष पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  दरम्यान याबाबत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना संपर्क केला असता,  उपप्रादेशिक परिवहन विभागाने कोणतीही तक्रार दिलेली नसल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती दिली आहे. 

आत्मदहनाची धमकी देणा-या अशोक पाटील यांना वाहनांचा टॅक्स भरायचा नसल्याने ते प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी वाहन निरीक्ष नियुक्ती केले असून ते तपास करत आहेत. -नानासाहेब बच्छाव,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.