शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ले सामाजिक चिंतेचा विषय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:48 IST

 मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा ...

 मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाप्रती घडणा:या घटना, सर्वसामान्यांकडून पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार पहाता पोलिसांचा धाक कमी होतोय की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल देखील खच्चीकरण होत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी कडक पाऊल उचलने गरजेचे ठरणार आहे. आठवडाभरात पोलिसांना मारहाणीचा किंवा धक्काबुकीच्या तीन घटना घडल्याने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हवाच. त्यासाठी पोलिसांकडून कायद्याचा देखील धाक दाखविला जातोच. परंतु सध्या गुन्हेगारांचा पुळका असणा:या विविध संघटना, त्यांचे गल्लीबोळातील कार्यकर्ते लक्षात घेता पोलिसांकडून कुणाला मारहाण झाली, धाक दाखविला गेला तरी त्याचा जाब विचारणारे कमी नाहीत. मानव अधिकाराचा भंग झाल्याची ओरड केली जाते. न्यायालात देखील अशा बाबी आणल्या जातात.  काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील त्यात मागे नसतात. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी आपला धाक दाखविण्याचा प्रय} केला तर लागलीच खिशातील मोबाईल काढून त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून ती सोशल मिडियावर व्हायरल केली जाते. पोलिसांनी कशी दबंगगिरी केली, सर्व सामान्यांप्रती पोलिसांचा व्यवहार कसा याबाबत सोशलमिडियातील तज्ज्ञांना पुळका येतो. ही बाब लक्षात घेता आता पोलिसांनीही नरमाईचे धोरण स्विकारल्याचेच दिसून येते. परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीकडून पोलिसांवर हात उचलण्याचे, त्यांना धक्काबुकी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. नंदुरबार शहर व जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील घटना लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने समोर येत आहे. शहरातील एका गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलीस महिला कर्मचा:याला एका युवकाकडून शिविगाळ व धक्काबुकी झाली होती. त्याची रितसर फिर्याद नोंदविण्यात आली. त्यानंतर वादग्रस्त पोस्टर्स प्रकरण घडले. त्यानंतर मोलगी येथे कॉपी पुरविणा:यांकडून पोलिसाला मारहाण झाली. बुधवारी विसरवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचा:यांना जमावाकडून मारहाण झाली. त्यात तिघे पोलीस जखमी झाले. शिवाय पोलीस निरिक्षकांनाही धक्काबुकी करण्यात आली. या सर्व घटनांची फिर्याद दाखल झालेली आहेच. गुन्हेगारांना शिक्षाही होईलच. परंतु यामुळे पोलिस कर्मचा:यांचे मनोबल कमी होत आहे त्याकडे कोण पहाणार हे देखील लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक संजय पाटील हे पोलीस दलात विविध उपक्रम राबवून पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय} करीत आहेत. चांगले काम करणा:यांना लागलीच गौरविण्यात येत आहे. कर्मचा:यांसह त्यांच्या कुटूंबियांसाठी आरोग्य, खेळ, प्रशिक्षणे यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. पोलीस दलात हे सर्व चांगले उपक्रम सुरू असतांना बाहेर मात्र, जनतेकडून पोलिसांना अपमानाची वागणूक सहन करावी लागत आहे. गुन्हेगारांवरील वचक निर्माण करून गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना आता आपला दंडुका बाहेर काढण्याची वेळ आली आहे. उठसूठ कुणीही यावे आणि पोलिसांवर हात उगारावा, त्यांना धक्काबुकी करावी ही बाब पोलिस दलाच्या दृष्टीने देखील नामुष्कीची ठरत आहे.