शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात महामार्गाच्या दुरुस्तीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नेत्रांग ते शेवाळी या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या नेत्रांग ते शेवाळी या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने १५ ते २० दिवसात कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने सोमावल ता़ तळोदा येथे २७ रोजी होणारा रस्तारोको स्थगित करण्यात आले आहे़ आमदार राजेश पाडवी व विभागाचे अभियंता कांकरिया यांच्या उपस्थितीत तळोदा पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गावर तळोदा ते खापर दरम्याप पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने त्यांच्याकडून २७ रोजी सोमावल येथे नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता़ मार्गावर आतापर्यंत तीन ते चार जणांनी प्राण गमावले असून माजीमंत्री पद्माकर वळवी यांचे बंधू सुधाकर वळवी यांचाही खड्ड्यामुळे अपघात होऊन त्यांना दुखापत झाली होती़ यातून संतप्त नागरिकांनी संबधित विभागासोबत संपर्क करुनही दाद दिली जात नसल्याचे चित्र होते़ या प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेत आमदार राजेंद्र पाडवी यांनी रस्ते विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती़ यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली़ आमदार पाडवी व अभियंता कांकरीया यांच्या चर्चा झाल्यानंतर १५ दिवसात दुरुस्तीबाबत आश्वासन देण्यात आले़ आश्वानंतर सोमावल येथे होणारे आंदोजन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले़ यावेळी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, विरसिंग पाडवी, किरण सूर्यवंशी, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, गोपी पावरा, प्रकाश वळवी आदी उपस्थित होते.आमदार राजेश पाडवी यांनी महामार्ग रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे महामार्ग दुरुस्ती बाबत संवाद साधला होता़ परंतू त्यावर संबधितांनी कारवाई न केल्याने आंदोलन पुकारण्यात आले होते़