शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शनअभावी आश्रमशाळा इमारत निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:08 IST

तळोदा एकात्मिक प्रकल्प : इमारत पूर्ण झाल्या पण वीज कनेक्शन नसल्याने हस्तांतरण रखडले

तळोदा : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील चार शासकीय आश्रमशाळांचे बांधकाम पूर्ण होवून साधारण तीन ते चार वर्षे झाली आहेत. तथापि या इमारतींना वीज कनेक्शन जोडले नसल्याने त्यांचे हस्तांतरणदेखील रखडले आहे. परिणामी येथील विद्याथ्र्याना भौतिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. निदान सलसाडी शाळेतील प्रकरणाची दखल घेवून आदिवासी विकास विभागाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा:या भांगरापाणी, बिजरी, होराफळी व तालंबा अशा चार शासकीय आश्रमशाळांच्या इमारतींच्या बांधकामास आदिवासी विकास विभागाने प्रत्येकी साडेतीन कोटी  अशा 14 कोटी रूपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात सन 2010 पासून इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या मार्फत करण्यात आले. परंतु बांधकाम पूर्ण होऊन जवळपास तीन ते चार वर्षे झाली आहेत. असे असतांना केवळ विद्युत जोडणीअभावी इमारतींचे हस्तांतरणदेखील रखडले आहे. परिणामी कोटय़ावधी रूपये             शासनाने खर्च करूनही आदिवासी विद्याथ्र्याना पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागत आहे. वास्तविक इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संबंधीत विभागाने केवळ दोनच वर्षाची दिलेली असतांना आज आठ वर्षे झालेली आहेत. तरी देखील संबंधीत यंत्रणेच्या उदासिन धोरणामुळे आजही प्रकल्पाला ताब्यात मिळालेली नाही.  इमारतीच्या हस्तांतरणासाठी तळोदा प्रकल्पाने सनबंधितांकडे गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासून तगादा लावला आहे. आतादेखील त्यांना स्मरणपत्र पाठविले आहे. त्याचबरोबर या इमारती राहण्या योग्य आहेत की नाही याबाबतही शहादा बांधकाम विभाग व दक्षता गुणनियंत्रण विभागास लेखी कळविले आहे. त्याचाही खुलासा अद्याप देण्यात आला नसल्याचे प्रकल्पाचे म्हणणे आहे. आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने इमारतींच्या हस्तांतरणाबाबत मिळमिळीत भूमिका घेतल्यामुळेच संबंधीत यंत्रणा देत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. सलसाडी आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यूची घटना केवळ विजेचा शॉक लागून झालेली असतांना कनेक्शन जोडणीबाबत संबंधीत विभाग अजूनही ठोस कार्यवाही करायला तयार नाही. या प्रकरणी पालकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र नाराजीचा सूर असून, इमारतींचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ण करून हस्तांतरण करण्यासाठी संबंधितांना सक्त ताकीद द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात पालकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.