शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हातपंपवर धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी तेथे काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी तेथे काही सुविधाही करण्यात आल्या. परंतु भांगणापाणी ता.अक्कलकुवा येथील आश्रमशाळेतील पाण्याची सुविधा काही दिवसांपासून मिळत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना हातपंपचा आधार घ्यावा लागत आहे.अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासींच्या सर्वागिण विकासासाठी तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात ठिकठिकाणी आश्रमशाळा देखील सुरु करण्यात आल्या आहे. त्यात भांगरापाणी येथील आश्रमशाळा ही केवळ अक्कलकुवाच नव्हे तर धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील मध्यवर्ती ठरत आहे. ही आश्रमशाळा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते. पाण्याच्या सुविधेनिमित्त का असेना पुन्हा ही शाळा चर्चेत येऊ लागली आहे.आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळेपासून अर्ध्या किलोमिटर असलेल्या हातपंपवर पाणी घेण्यासाठी जात आहे. ही परिस्थिती काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यामुळे शाळेतील पाण्याची सुविधा कदाचित बंद पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपवर धाव घ्यावी लागत आहे.भांगरापाणी येथील हातपंप हे दुर्गम भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपवर जाणाºया विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांचा हा धोका कमी करण्यासाठी आश्रमशाळेतच पिण्याच्या पाण्याची सुविधा होणे आवश्यक असल्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा प्रशासन याबाबत कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.