लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आशा व गटप्रवर्तक यांनी शहरातील नेहरु चौकात धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली़ आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आल़े निवेदनात, दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत़ राज्यभरात आशा व गटप्र्वक यांनी 3 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु केले आह़े आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय करुन मानधन वाढवण्याचा आदेश काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आह़े येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास नाशिक येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणा:या कार्यक्रमप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह़े निवेदनावर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वैशाली खंदारे, रत्ना नंदन, ललिता माळी, कमिता गावीत, रामेश्वरी वसावे, ममता पाटील, विजय दराडे, गुली पावरा, मंदाकिनी पाटील, कल्पना गावीत, पन्नू गावीत यांच्या सह्या आहेत़ सकाळी 9 वाजेपासून नेहरु पुतळा परिसरातील जुने तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर आशा सेविका गटप्रवर्तकांनी आंदोलनास सुरुवात केली होती़ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सेविकांनी मानधन वाढीची मागणी घोषणांद्वारे लावून धरली होती़ दुपारी कडक ऊन असतानाही महिला येथे बसून होत्या़ अनेकींनी सोबत मुलाबाळांना आणले असल्याने त्यांच्याकडून सावलीचा आधार घेतला जात होता़ सायंकाळी पाच वाजेर्पयत महिला याठिकाणी ठाण मांडून होत्या़ सायंकाळी वाहनांद्वारे त्या घरांकडे रवाना झाल्या़
जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:04 IST