लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहर पोलीस ठाण्यासह रेल्वे पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल असलेल्या फरार आरोपीला पोलीस पथकाने करण चौफुली परिसरातून ताब्यात घेतल़े बुधवारी रात्री आठ ते साडेआठ दरम्यान ही कारवाई करण्यात आली़ सय्यद जुल्फेकार उर्फ बबलू अली रा़ मुजावर मोहल्ला असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आह़े बुधवारी रात्री तो करण चौफुली परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार यांच्यासह पथकाने त्याला सापळा रचून अटक केली़ त्याला शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कारवाई करण्यात आली़
विविध गुन्ह्यातील फरार आरोपीस शहरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:28 IST