शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
2
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
3
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
4
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर येणार, दिग्दर्शक ओम राऊतची घोषणा
5
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
6
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
7
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
8
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
9
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
10
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
11
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
12
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
13
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
14
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
15
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
16
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
17
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
18
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
19
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
20
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा

खाद्य महोत्सवात दरवळला रानभाज्यांचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ासह सपाटीच्या भागातील रानावनात उगवणा:या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी शहरातील खवय्यांना उपलब्ध झाली़ छत्रपती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ासह सपाटीच्या भागातील रानावनात उगवणा:या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची संधी शहरातील खवय्यांना उपलब्ध झाली़ छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाच्या डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवाला शेकडोंच्या संख्येने खवय्यांनी हजेरी देत विविध भाज्यांची चव चाखली़  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार, बायफ, महिला आर्थिक विकास मंडळ, योजक पुणे, कृषी विज्ञान केंद्र कोळदे आणि रीड्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा खाद्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषीतज्ञ गजानन डांगे होत़े प्रमुख अतिथी म्हणून स्त्री शक्तीच्या श्रीमती बेदी, सहायक प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, जात पडताळणीचे सहसंचालक दिनेश तिडके, कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे, शुभांगी सपकाळ उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांसह मौखिक ज्ञान परंपरा सांभाळणा:या ज्योतीबाई वसंत पावरा, नोवी सुनील पाडवी, बाधाबाई अशोक कोकणी, शकुंतलाबाई देविदास रावताळे या महिला प्रतिनिधींच्या  हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आल़े  महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नावली ता़ नवापुर येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केल़े डॉ़डांगे यांनी आदिवासी व ग्रामीण समाजाकडे अत्यंत समृद्ध अशी ज्ञान परंपरा आह़े या ज्ञानाचे लेखन करणे व हा वारसा जपून ठेवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आह़े पुढील पिढीसाठी हे लेखन दीर्घकाळ उपयुक्त ठरेल असे सांगितल़े प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी देसाई यांनी तर सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ आर.पी. देशमुख यांनी केले.

अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नवापुर येथील महिलांनी महोत्सवात सहभाग घेतला होता़ 150 पेक्षा अधिक सहभागी महिलांनी 70 स्टॉल्सद्वारे 42 विविध रानभाज्यांची मांडणी केली होती़ घरुन तयार करुन आणलेल्या भाज्यांसोबत नाचणी, ज्वारी, दादर, मका यांच्या भाकरीही महिलांनी तयार करुन आणल्या होत्या़ या भाज्यांची चव घेत मान्यवरांनी परीक्षण करुन माहिती जाणून घेतली़ औषधी गुणधर्म असलेल्या भाज्यांची माहिती महिलांकडून देण्यात आली़