शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजनेची मंजूर कामे तीन महिन्यात पुर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेची मंजुर कामे तीन महिन्याच्या आत पुर्ण करण्याची ग्वाही अधिका:यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेची मंजुर कामे तीन महिन्याच्या आत पुर्ण करण्याची ग्वाही अधिका:यांनी रविवारी झालेल्या बैठकीत दिली. दरम्यान, जे ठेकेदार वेळेत काम करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे व कामांना जे विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिल्या. तापीवरील 22 उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्तीच्या कामांसाठी शेतक:यांनी उपोषण केले होते. 2 रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानुसार रविवारी बैठक झाली. जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील व संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व अधिका:यांकडून मंजुर असलेल्या कामांनुसार सद्य स्थिती जाणून घेतली. त्यानंतर शेतक:यांचे म्हणने ऐकुण घेण्यात आले. त्यात तफावत दिसून आली. दीपक पाटील यांनी मंजुर कामे आधी सुरू करा ही कामे झाल्यावर पुढच्या कामांचे पाहू असे सांगितले. पहिले पाणी कधी मिळेल ते सांगा असे निर्वाणीचे सांगिगतले. त्यामुळे अधिकारीही चाचपडले. जिल्हाधिका:यांनी त्यानंतर सर्व संबधीत अधिका:यांकडून कुठले काम कधी पुर्ण होईल याची तारीख जाणून घेतली. साधारणत: तीन महिन्याच्या आत काम पुर्ण होईल या निष्कर्षाप्रत जिल्हाधिकारी आले. त्यांनी ही कामे पुर्ण होईर्पयत संबधीत विभागाचे अधिकारी, ठेकेदार, शेतकरी यांची समन्वय बैठक दर 15 दिवसात घ्यावी. तसा अहवाल द्यावा.  जे कुणी ठेकेदार कामात दिरंगाई करतील. कामचुकार पणा करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून प्रसंगी काळ्या यादीत टाकावे. पाईपलाईन टाकणे, वीज खांब उभारण्यालाही कुणी अडथळा आणत असतील तर अशा लोकांवरही थेट सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करावे असे आदेश जिल्हाधिकारी मंजुळे यांनी दिले.यावेळी माजी आमदार अॅड.के.सी.पाडवी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, तापी खो:याचे कार्यकारी अभियंता आमले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरीउपस्थित   होते. यामुळे उपसा सिंचन योजना सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.