शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 41 लाख रुपयांच्या खर्चासह 39 कोटी रुपयांच्या शिलकीला मंजूरी देण्यात आली़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 41 लाख रुपयांच्या खर्चासह 39 कोटी रुपयांच्या शिलकीला मंजूरी देण्यात आली़ सभेत एकूण 17 विषय मांडण्यात येऊन बहुमताने मंजूर करण्यात आल़े सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़  मंगळवारी सकाळी 11 वाजता  नगरपालिका आवारातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होत़े व्यासपीठावर उपनगराध्यक्ष परवेज खान करामत खान, मुख्याधिकारी गणेश गिरी उपस्थित होत़े प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आल़े यानंतर विषयांचे वाचन सुरु झाल़े नगराध्यक्षांची रजा मंजूर करणे, आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्चाचा हिशोब सादर करण्यात आला़ यास सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताने मंजूरी दिली़ पालिकेकडे हस्तांतरणीय विकास हक्क देऊन जमिन अधिग्रहण करण्यासाठी प्रणाली व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली़ विषयाला मंजूरी मिळाल्यानंतर  होऊ घातलेल्या टीडीएस योजनेसाठीच्या समितीत विरोधी गटाच्या नगरसेवकाची समितीत निवड करण्याची मागणी करण्यात आली़ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022 र्पयत पात्र लाभार्थीना घरकुल उपलब्ध करुन देण्याच्या कामाची अंमलबजावणी करण्याचा विषय मंजूर करण्यात आला़ यावेळी विरोधी गटाने घरकुल लाभार्थीना सुविधा नसल्याचा आरोप केला़ सभेदरम्यान पालिका  घनकचरा व्यवस्थापनांतर्गत बायोमायनिंग ऑफ ओल्ड डंप्ड, सॉलिड वेस्टचे काम करणारे मक्तेदार, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जागेस वॉलकंपाउंड बांधणारे ठेकेदार, अमृत योजनेंतर्गत 2015-16 या वर्षासाठी नमस्कार कॉलनी ब्युरीयल ग्राऊंड ओपन स्पेस क्रमांक नऊ आणि 11 या जागेत पब्लिक पार्क विकसित करणारे आणि अमृतयोजनेंतर्गत 2017-18 या वर्षासाठी बन्सीलाल नगर, राणी माँ पार्क, एमएल टाऊन, द्वारकाधिश नगर, समर्थ नगर, मैय्यबी नगर, स्वामी समर्थ नगर येथे अमृत वन विकसित करणे या पाच कामांच्या ठेकेदारांच्या मुदतवाढीच्या अर्जावर चर्चा झाली़ हे विषय मंजूर केल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसुली करण्याची मागणी विरोधी गटाने केली़  सिटी सव्रे क्रमांक 169 पैकी जागेवरील 141 चे आरक्षण व्यपगत झाल्याने त्यावर निर्णय घेणे, पालिकेस आवश्यक नसलेले जागा फायर ब्रिगेड स्टेशनच्या आरक्षणातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या अर्जावर विचारविनिमय करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सी आणि डी करीत शुल्क आकारणी बाबत विचार विनिमय, संगणक प्रणाली अद्ययावत करणे करण्यासाठी संभाव्य खर्चास मंजूरी देण्यासह पालिका हद्दीतील गट क्रमांक 400 ते 404 हे क्षेत्र शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या निर्णयास अंतिम मंजूरी देण्याच्या विषयांना मंजूरी देण्यात आली़ 

सभेदरम्यान नगरपालिकेने कर व दरातून 2018-19 या वर्षात 10 कोटी 61 लाख 53 हजार 767 रुपये, विशेष अधिनियमाखाली 45 लाख 21 हजार 803, मिळकत व अधिकारापासून 2 कोटी 19 लाख 96 हजार 399 वसुली केली होती़ अनुदानापोटी पालिकेकडे 16 कोटी 68 लाख 24 हजार 992, संकीर्ण 5 कोटी 99 लाख 91 लाख 308 असे एकूण 39 कोटी 68 लाख 43 हजार 15 रुपये पालिकेकडे यंदाच्या आर्थिक वर्षात जमा झाले होत़े गत वर्षभरात पालिकेकडून सामान्य प्रशासन, सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य व सुखसोई, शिक्षण यासाठी 41 लाख 91 हजार 747 रुपयांचा खर्च करण्यात आला़ या संपूर्ण खर्चाला पालिकेच्या सभेत मंजूरी देण्यात आली़ 

सभेत पालिका हद्दीतील मालमत्तांची 2019-2020 ते 2022-2023 चतरुर्थ वार्षिक कर आकारणी करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला़ या ठरावानुसार पालिका कर वाढीबाबत विचारविनिमय करुन बांधकामांचा आढावा घेऊन करवाढ किंवा त्यासंदर्भातील कामकाजाबाबत शासनाला प्रस्ताव सादर करणार आह़े या प्रस्तावानंतर पुढील कारवाई होणार आह़े किमान सहा महिने मोजमापे करण्यात येऊन सव्रेक्षण होणार असल्याची माहिती आह़े