अक्कलकुवा व नवापूर या दोन विधानसभा मतदारसंघांचा त्यांच्या कार्यक्षेत्रात समावेश राहणार आहे. जाट यांनी यापूर्वी खापर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासह संघटनात्मक जबाबदारी सांभाळली आहे. शिवसेना नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचे ते समर्थक आहेत. ललितकुमार जाट यांच्यासह जिल्हा समन्वयकपदी रोहित चौधरी (अक्कलकुवा विधानसभा), जिल्हा चिटणीस योगेश पाटील (अक्कलकुवा विधानसभा), युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश साटोटे (नवापूर विधानसभा), सचिन पाडवी (अक्कलकुवा विधानसभा), अक्कलकुवा तालुका युवासेना प्रमुख वीरबहादूरसिंह राणा, नवापूर तालुका युवासेना प्रमुख नरेंद्र गावीत, धडगाव तालुका युवासेना प्रमुख मुकेश वाहऱ्या वळवी यांचीही निवड जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी नंदुरबार जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, पृथ्वीसिंग पाडवी, सरपंच छोटूलाल पाडवी, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, जी.डी. पाडवी, गोलू चंदेल, जसराज पवार व शिवसैनिक उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा युवासेना प्रमुखपदी ललितकुमार जाट यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST