रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात कूपनलिकांची पाणी पातळी अचानक खालावू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून, ऊस, पपई, केळी सारख्या पिकांना पाणी देणे आणखीनच अवघड होणार असल्याचे चित्र आहे. परिसरातील रोझवा, गोपाळपूर शिवारात पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
पोळ सणासाठी शेतकऱ्यांत उत्साह
नवापूर : शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असणार पोळ्याचा सण येऊन ठेपला आहे. यावेळी पोळा सणासाठी लागणारे पशुधन सजविण्याचे साहित्य व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारात शनिवारी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पोळ्याच्या सणाची जोरदार तयारी करीत आहेत.
चारा विक्रीतून अनेकांना रोजगार
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी सह परिसरात रोजगाराची समस्या आतापासूनच भेडसावू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांकडून ऊस, केळी, पपई, कापूस सारख्या मोठ्या पिकातून हिरवा चारा काढून तो तबेला धारक व पशुपालकांना विक्री करून त्यातून रोजगार उपलब्ध करीत आहेत.