शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माळखुर्द येथील अंकिताच्या चेह:यावर आले स्मितहास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:25 IST

दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम

नारायण जाधव । ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तळोदा तालुक्यातील माळखुर्द गावातील अंकिताच्या चेह:यावर स्मितहास्य आले आह़े विशेष म्हणजे माळखुर्दर्पयत जाण्यास कुठलेही वाहन नसताना 10 किमी पायपीट करीत आरोग्य विभागाचे कर्मचारी तिथर्पयत पोहचले आहेत़दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न गंभीर रुप धारण करीत आह़े याचेच एक उदाहरण म्हणून माळखुर्दकडे बघता येईल़ या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही़  परिणामी वाहनव्यवस्थादेखील अद्याप पोहचली नाही़ त्यामुळे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाच्या पथकाने पायपीट करुन माळखुर्द गाठल़े गावातील सहा वर्षाआतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ त्यात, अंकिता राजेंद्र वळवी ही बालिका दुभंगलेले ओठ व टाळूसोबत आढळून आली़ गेल्या काही वर्षापासून ती याच परिस्थितीत वाढत होती़ यामुळे तिच्या चेह:यावरील हास्यच जणू कोणीतरी हिरावून घेतले असल्याची भावना तिच्या पालकांमध्ये होती़ परंतु अशिक्षीतता व खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने अंकिता व तिच्या पालकांनीही आहे त्या परिस्थितीसोबत पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु आरोग्य कर्मचा:यांच्या येण्याने अंकितासह तिच्या पालकांच्याही आशा पल्लवीत झाल्या़ पथकातील डॉ़ विजय पाटील, डॉ़ सुनील लोखंडे, पर्यवेक्षिका कविता अहिरराव तसेच कर्मचा:यांनी अंकिताच्या पालकांना शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली़ यानंतर अंकितादेखील इतर सामान्य मुलांप्रमाणे दिसेल असा विश्वास दिला़ त्यामुळे याला पालकांचीही सहमती मिळाली़