शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे काम रखडल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:48 IST

चिंचपाडा : ग्रामस्थांना 18 किमीचा घालावा लागतो वळसा, काम थांबवल्याने समस्या

चिंचपाडा : चिंचपाडा ता़ नवापूर येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले असल्याने सर्वसामान्यांकडून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील या उड्डाणपुलासह रायंगण नदी, गंगापूर नदीवरील पुलाचे कामही रखडत असल्याने दळणवळणाची गती वाढविण्यासाठी उर्वरीत काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या पुलाचे काम रखडले असल्याने ग्रामस्थांना विसरवाडीला जाण्यासाठी जुन्या महामार्गावरुन वाहतूक करावी लागत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेरुन 18 किलो मीटरचा वळसा घालत विसरवाडीला जावे लागत आह़े यामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा दोन्हींची बचत होणार आह़े रोजंदार व विद्याथ्र्याचे हालविसरवाडी तसेच लगतच्या गावातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी तर रोजंदार आपआपल्या कामानिमित्त तालुक्याला जात असतात़ त्यामुळे त्यांना पुलाअभावी मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े रायंगण नदी, गंगापूर नदी तसेच रेल्वे मार्गावरील पुल या तिन्ही पुलांचे काम झाल्यास त्याचा 18 किमीचा फेरा वाचणार आह़ेजुन्या महामार्गावर वाहतूक कोंडीतिन्हीही पुलांचे काम रखडले असल्याने साहजिकच जुन्या महामार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आह़े एकाच मार्गावर दळणवळण व्यवस्था अवलंबून असल्याने साहजिकच या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असत़े त्यातच, सकाळ व सायंकाळ तर जुन्या महामार्गावर मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असत़े त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वेळावेळी वाढ होत असत़े दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी त्यानुसार वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत़ नोकरदार व विद्याथ्र्यासह शेतक:यांनाही तालुक्याच्या ठिकाणाहून आपल्या मालाची ने-आण करण्यासाठी मोठी अडचण होत आह़े या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यास शेतक:यांनाही सोयीचे होणार आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आह़े