नंदुरबार : शहरातील भारतीय जनता पार्टी युवामोर्चातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमातापूजन, तसेच लष्करातील सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, युवामोर्चा जिल्हा सचिव मयूर चौधरी, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बागुल, माजी सैनिक प्रकाश हरी सैंदाणे, प्रवीण वसईकर, मुकेश पाटील, प्रकाश पाटील, रामेश्वर सूर्यवंशी, दीपक पवार, युवामोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप राजपूत, सुनील वाघरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतापपूर, ता.तळोदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात हर्षाकुमारी राणा यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षण समितीच्या उपाध्यक्षा विद्या पाटील, राणा प्रताप इंग्लिश स्कूलमध्ये गोपाल वाढणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शहीद जवान व कोविड महामारीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास राणा प्रताप शाळेचे मुख्याध्यापक हेमलाल मगरे, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख आर.बी. निकुंभ, मुख्याध्यापिका मनिषा ठाकूर, मंडळ अधिकारी सी.बी. नायक, तलाठी पी.आर, निकुम, ग्रामविकास अधिकारी पी.जी. माळी, पोलीस पाटील, बबन इंद्रजीत, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सुरेश इंद्रजीत, साहेबराव चव्हाण, नारायणसिंग राजपूत, प्रेमसिंग गिरासे, सूरतसिंग राजपूत, कैलास पाटील आदी उपस्थित होते. आभार एस.सी. मराठे यांनी मानले.
के.डी. गावीत विद्यालय, ठाणेपाडा
नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील के.डी. गावीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर प्राचार्य बी.डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिकचे मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. यानंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन जी.के. पवार तर आभार के.डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी ए.व्ही. घुगे, गुलाब पवार, नितीन पाटील, एस.एन. निकम, सुरेश माळी, बी.वाय. पाटील, के.डी. पाटील, व्ही.यू. घुगे, जी.वाय. सोनवणे, मनोज शेवाळे, डी.बी. पाटील, सचिन कोळी, फुलवंती साबळे, आर.जे प्रधान, अनिल पाटील, वसंत पाटील आदींनी परिश्रम घेतले.
रांझणी
रांझणी, ता.तळोदा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजर करण्यात आला. यावेळी झेंडा चौक, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळेत पोलीस पाटील दिलीप भारती, यशवंत मराठे, शालेय समिती अध्यक्ष सुरेश मोरे, यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच अश्विनी गोसावी, विजय ठाकरे, कृष्णा ठाकरे, योगेश गवळी, विठोबा महाले, सुधाकर उगले, भास्कर गवळी, युवक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुरेश जाधव, जिल्हा परिषद कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.