शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा परिसरात आमचूर बनविण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:10 IST

सुटय़ांमुळे मुलांचीही मदत : सातपुडय़ातील शेतशिवार व पाडे गजबजले

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : सातपुडय़ाच्या द:याखो:यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह आंब्याच्या झाडाखाली सावलीचा आधार घेत आमचूर तयार करण्याच्या कामात सध्या व्यस्त  आहेत. शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी गेलेली मुलेही उन्हाळ्याच्या सुटीत घरी परतले असून आमसूल तयार करण्यासाठी त्यांचीही मदत मिळत आहे.सातपुडय़ात कच्च्या कैरीपासून आमचूर तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. सातपुडय़ाच्या द:याखो:यातील आदिवासी बांधवांच्या घरात, अंगणात, वाडय़ात, झाडाखाली, शेतामध्ये कैरीपासून आमचूर तयार करताना संपूर्ण कुटूंब दिसून येत आह़े अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी, डाब, जमाना, साकळीउमर, पिंपळखुटा, वडफळी, तसेच धडगाव तालुका व गुजरात राज्यातील डेडीयापाडा परिसरातील गाव पाडय़ांवर आमचूर तयार करण्यात येतो़ मात्र आमचूरची बाजारपेठ फक्त मोलगी व धडगाव येथेच आहे आणि याठिकाणीच व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे मोलगी व वडफळी परिसरातील आमचूर विक्रेते मोलगी बाजारपेठेत तर धडगाव परिसरातील आमचूर विक्रेते धडगाव बाजारपेठेत आमसूलची विक्री करीत असतात.बाजारपेठेत आमचूर 160 रुपयांपासून तर 250, 300 रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. कच्च्या कैरींचा हंगाम सुरू झाल्यानंतर सातपुडय़ाच्या द:याखो:यात तसेच परसबाग आणि शेतबांधावरील आंब्याच्या झाडांना लागलेल्या कै:या तोडून त्यापासून आमचूर तयार करण्याच्या कामांना सुरूवात होत़े ज्यांची आंब्याची झाडे नाहीत अशांकडून गावोगावी फिरुन आंब्याची झाडे शोधून, झाडावर लागलेल्या कै:यांची खरेदी करण्यात येत़े चार ते पाच हजार रुपयांपासून तर 10 ते 15 हजार रूपयांर्पयत झाडावरील कै:यांची खरेदी करण्यात येत़े कैरी खरेदी केल्यावर, झाडावरून कै:या तोडून त्या झाडाखालीच आदिवासी बांधव संपूर्ण  कुटुंबासह सावलीत बसून आमचूर तयार करतात यासाठी त्यांचा रात्रंदिवस पडाव तिथेच असतो. कच्च्या कैरीपासून आमचूर व कैरीमध्ये निघणारी कोहळी व कोहळीमधील गरदेखील विक्री होतो. फोडलेली कोहळी पाच रुपये किलो व कोहळीमधील गर तीन ते चार रुपये किलोने विक्री होतो.