शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेतच महिलेने दिला बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील झामणङिारा येथील गरोदर मातेला रूग्णालयात नेतांना वाहनातच प्रसुती करून बाळ व माता यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील झामणङिारा येथील गरोदर मातेला रूग्णालयात नेतांना वाहनातच प्रसुती करून बाळ व माता यांना वाचविण्यात 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर व सहकारी कर्मचा:यांना यश आले.  आई व बाळ दोन्ही सुखरूप असून, ग्रामीण भागातील रूग्णांसाठी 108 क्रमांकाचे वाहन केवळ रूग्णवाहिकाच नव्हे तर जीवनदायिनी ठरत आहे. शनिवारी पुणे मुख्यालयातून नवापूर येथील 108 रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका:यांना तालुक्यातील दुर्गम भागातील झामणझीरा येथे जावून गरोदर मातेला प्रसुतीसाठी नवापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करा या आशयाच्या सूचना देण्यात आल्या. सूचना मिळताच 108 या रूग्णवाहिकेवर डॉ.राहुल सोनवणे व  पायलट लाजरस गावीत यांनी  तातडीने झामणझीरा गाव गाठलं. तातडीने प्रतिमा अजय गावीत (21) या गरोदर मातेला नातेवाईंकासह रूग्ण वाहिकेत घेत. रूग्णवाहिका नवापूर उपजिल्हा रुग्णालयाकडे कुच करीत असताना मध्यरात्री अध्र्या रस्त्यातच प्रतिमा गावीत यांना असह्य प्रसववेदना सुरू झाल्या.  आई व बाळासाठी हा जीवन  मरण्याचा प्रश्न असल्याचे हेरून डॉ.राहुल सोनवणे यांनी रूग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती केली. यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात बाळ व माता यांना दाखल करण्यात आले. चक्क रूग्णवाहिकेतच बाळाचा जन्म झाला. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने माता व बाळ सुखरूप आहेत.