जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी काढलेल्या आदेशात इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. परंतु नाभिक समाजाचा व्यवसाय सलून पार्लर बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. हा नाभिक समाजावर अन्याय आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सलून पूर्णतः बंद असून, नाभिक समाज आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा संक्रमण दर कमी झालेला असून, आम्ही पूर्ण काळजी घेऊनच व्यवसाय करू. इतरही काही जिल्ह्यांमध्ये सलून पार्लर सुरू झालेले आहेत. तरी नाभिक समाजास देखील सलून पार्लर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती निवेदनामध्ये केलेली आहे. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा नाभिक समाज जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, संस्थेचे सचिव अरविंद निकम तसेच सलून दुकानदार कन्हैया मोरे, राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत राठोड, मुकेश हीरे, पंकज जगताप व समाज बांधव उपस्थित होते. निवेदनावर सर्वांच्या सह्या आहेत.
सलून पार्लर उघडण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST