शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मयत महिलेच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सोमावल खुर्द येथील मयत झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सोमावल खुर्द येथील मयत झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र रविवारी रात्री नंदुरबार येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचे तळोदा तालुक्यातील खूषगव्हान कनेक्शन समोर आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.तळोदा तालुक्यातील सोमवल खुर्द येथील महिलेचा २४ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. २५ मे रोजी तिच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते. तिची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्या चाचणीचा अहवाह २७ मे रोजी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील सात जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या सातही जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. यातील काही जणांचा महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जवळून संपर्क आला होता. त्यामुळे सोमवल खुर्द ग्रामस्थांचा जीव टांगणीला होता. या सातही जणांच्या कोरोणा चाचणीकडे ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागून होते. रविवारी रात्री या सात जणांचे कोरोना अहवाह निगेटिव्ह आल्याने छोटा सोमावल ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रविवारी रात्री नंदुरबार येथील कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णाच्या संपर्कात तळोदा तालुक्यातील खूषगव्हाण येथील दोन व्यक्ती संपर्कात आल्याचे समोर आल्याने प्रशासनाची पळापळ झाली. तालुका प्रशासानाकडून रात्री दोन वाजेच्या सुमारास या दोन्ही जणांसह त्यांच्या कुटुंबातील एकाला आमलाड विलगीकरण कक्षात आणण्यात आले. सध्या तरी त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याचे तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांचेदेखील स्वाब घेण्यात येणार आहेत. दरम्यान, सोमावल खुर्द येथील महिला कोरोना संशयित होती व तिचे स्वॅब घेण्यात आले असतांना तिचा मृत्यू झाल्यावर तिचा मृतदेह पाठवण्याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे हिंगणी ता.शहादा येथील प्रकारासारखाच प्रकार घडण्याची धास्ती होती. परंतु सुदैवाने छोटा सोमावल येथील सातही जणांचा अहवाह निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. खुषगव्हाण येथे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

नंदुरबार येथे रविवारी कोरना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णाला पाहण्यासाठी खुषगव्हाण, ता.तळोदा येथील दोन जण गेले होते. अशी माहिती मिळाल्यानंतर त्या दोघांना व त्यांच्या कुटुंबातील एकाला आमलाड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.- महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, तळोदा