शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

नंदुरबारात 26 रोजी सर्वपक्षिय मुकमोर्चा : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 14:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंडाईचा, ता.शिंदखेडा येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्व स्तरातून तीव्र निषेध होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी केल़े  दरम्यान, सोमवार 26 रोजी दुपारी साडेतीन वाजता मुकमोर्चा काढण्यात येणार आह़ेनंदुरबार येथे सर्व राजकीय पक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोंडाईचा, ता.शिंदखेडा येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सर्व स्तरातून तीव्र निषेध होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी केल़े  दरम्यान, सोमवार 26 रोजी दुपारी साडेतीन वाजता मुकमोर्चा काढण्यात येणार आह़ेनंदुरबार येथे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या तैलिक मंगलकार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होत़े याबाबत दोंडाईचा येथे झालेल्या निंदनीय घटनेची माहिती देताना पुढे म्हणाले की, अल्पवयीन बालिकेवर नुतन विद्यालय दोंडाईचा येथे एका नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचा केले. याबाबत संबंधित संस्थेचे प्रकरण दडपण्याचा प्रय} केला. पीडित बालिकेवर पोलीस स्टेशन, उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी आर्थिक आमिष दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.  स्थानिक समाज सेवकांच्या मदतीने बालिकेला जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. सध्या पीडित बालिका जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत जळगाव पोलीस ठाण्यात ङिारो नंबरने गुन्हा दाखल झाला आह़े व तो गुन्हा दोंडाईचा पोलीस ठाण्याला वर्ग झाल्याची माहिती चौधरी यांनी दिली.अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत़  तरी पीडित बालिकेस न्याय मिळावा, तिच्या परिवाराला धीर मिळावा व आरोपीस कठोर शासन व्हावे आणि भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी आपणदेखील नंदनगरीत सर्व जाती धर्माच्या, सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आपल्या संवेदना प्रकट कराव्यात यासाठी 26 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी साडेतीन वाजता तैलिक मंगल                  कार्यालयात मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चौधरी यांनी केले.बैठकीस सर्व स्तरातन निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यात व्यापारी असोसिएशन व र्मचट बँकेचे चेअरमन किशोर वाणी, माजी नगराध्यक्ष रवींद्र परदेशी, नगरसेवक व पालिकेचे गटनेते चारुदत्त कळवणकर, आरपीआय युवा आघाडीचे सुभाष पानपाटील, तेली समाज विभागीय महिला अध्यक्षा डॉ.तेजल चौधरी, अॅड.उमा चौधरी, शीतल चौधरी, माजी नगरसेवक मोहन माळी, मराठा युवा मंचचे अध्यक्ष महेंद्र मराठे, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी सुरेखा वाघ, पुष्पा थोरात, प्रवासी संघटना व शिंपी समाज अध्यक्ष गजेंद्र शिंपी, जिल्हा युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष मोहितसिंह राजपूत, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी, भाजपा शहराध्यक्ष मोहन खानवाणी, क्षत्रिय राणा राजपूत समाजाचे अॅड.अविनाश पाटील, जैन समाजातर्फे अमित जैन, वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने महादू हिरणवाळे, बाबा राजपूत, बागवान समाजाच्या वतीने लियाकत बागवान, भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पप्पू कुरेशी आदींनी तीव्र संताप व निषेध व्यक्त करत आरोपीस कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली.बैठकीस पीडित मुलीस न्याय मिळावा व आयोजित मूक मोर्चास भटक्या जाती जमाती हक्क परिषद, नंदुरबार जिल्हा वंजारी समाज, क्षत्रिय राणा राजपूत समाज, संभाजी ब्रिगेड, मंगळ बाजार भाजीपाला व्यापारी असोसिएशन, मंगळ बाजार व्यापारी असोसिएशन, शक्तीसागर युवक मंडळ, समस्त राजस्थानी ब्राrाण समाज, छत्रपती सेवा संघ, भाजपा वाहतूक सेल, गवळी समाज, समता परिषद, मराठा समाज, व्यापारी महाजन सामाजिक - सांस्कृतिक असोसिएशन, वैशवाणी समाज, भाजपा ओबीसी मोर्चा, भारतीय जनता पार्टी, युवा काँग्रेस, युवा सेना, जय हनुमान व्यायाम शाळा, कृषी उत्पन्न बाजार समिती, रामदास व्यायाम शाळा, मारूती व्यायाम शाळा, जळका बाजार व्यापारी असोसिएशन, भोई समाज, महाराष्ट्र माळी महासंघ, संगम ग्रृप, मोठा काळानंदी मित्र परिवार, संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ, न्यु सागर मित्र मंडळ, महारुद्र ग्रृप, फ्रुट संघटना व्यापारी असोसिएशन, कुणबी पाटील सांस्कृतिक मंडळ, क्षत्रिय राणा राजपूत सेवा समिती, कलाल समाज, मेहतर समाज, सिंधी समाज, जोशी समाज, चर्मकार समाज, ठाकूर समाज, गाडी लोहार समाज, चिरागगल्ली व्यायाम शाळा आदींनी पाठींबा देण्याचे जाहीर केले. बैठकीस गुलाब आहुजा, आनंद माळी, नीलेश माळी, कमल ठाकूर, शाम मराठे, सुरेश जोशी, शेख जब्बार, ग्यानजी भरवाड, नारायणदास वाघेला, राम कडोसे, केतन रघुवंशी, अॅड.धनराज गवळी, संतोष वसईकर, संदीप ठाकूर, रवींद्र लोहार, हरिष हराळे, धनसुख सोनार, राधेश्याम शर्मा, भगवान चौधरी, वाल्मिक राजपूत, संगिता सोनवणे, पुष्पाबाई पाटील, माधवी चौधरी, संजय शाह, बापू राजपूत, राजेंद्र राजपूत, संजय भदाणे, योगेश माळी, देविसिंह राजपूत, राहुल चौधरी, महाराष्ट्र तेली युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण चौधरी, शहराध्यक्ष सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक महाराष्ट्र तेली युवक आघाडीचे जिल्हा सचिव रुपेश चौधरी यांनी केले.