सकाळच्या रिमङिाम पावसात वासुदेवाला तयारी करण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे आठ वाजेनंतरच वासुदेवाला बाहेर पडता आले. आल्या आल्या त्याने सुभाष चौकातील एका हॉटेलात कडक चहा घेतला. त्यानंतर तेथेच गिरकी घेत त्याने दान मागण्यास सुरुवात केली. वासुदेवाचा आवाज ऐकुण काहीजण तेथे गोळा झाले. सहाजिकच तेथे मग निवडणुकीच्या गप्पा रंगल्या. दान मागत वासुदेव या गप्पांकडे कान लावून होतेच.. कायहो, चारही मतदारसंघांचे चित्र अजून स्पष्ट कसे होत नाही.. राष्ट्रवादीला जागा सुटत नसल्यामुळे जिल्हाध्यक्षच पक्ष सोडून जात असल्यामुळे पक्षाला वाली कोण राहणार, असाही पक्ष गेल्या पाच वर्षापासून दोन्ही बंधूंच्या आधारावरच तग धरून होता. आता तेच नसणार तर पक्ष चालणार कसा असा एकाने प्रश्न उपस्थित केला. दान मागतांना निवडणुकीतील हे मुद्दे कामी येतील म्हणून वासुदेवही तेथे थांबला. त्या चार जणांच्या गप्पा ऐकु लागला.. काँग्रेसमधील फुटाफूट मर्यादीत राहिली. शिवसेना तग धरून आहे. भाजपला सुगीचे दिवस आहेत. वंचीतही मोठी आशा लावून आहे. त्यातील एकाने सांगितले, काय करता, निवडणुकीचा हंगाम आला म्हणजे इकडून तिकडे उडी मारणारे, पक्ष सोडणारे, पक्षावर नाराजी दाखविणारे आणि पक्षाला अनपेक्षीतपणे ब्लॅकमेलींग करणारे उदयास येतात. राजकीय पक्षांनाही ते काही नवीन नसते. परंतु यंदा हे पीक जरा जास्तच जोमात असल्याचे दिसून येत आहे. अर्थात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयत हा खेळ चालेल.. नंतर रुसवे, फुगवे काढले जावूून नेत्यांच्या प्रचारासाठी हीच मंडळी पुढाकार घेतील.. या संवादानंतर वासुदेवही त्यांच्या गप्पांमध्ये सामिल झाला.. काय करता भाऊ चार दिवसांपासून नंदुरबारात फिरत आहे. निवडणूक लागली, दान भरभरून मिळेल अशी आशा होती, परंतु कसले काय, नेहमीचेच दान मिळतेय भाऊ.. पाहू या अर्ज भरल्यानंतर तरी फरक पडतोय की नाही.. त्यावर एका कार्यकत्र्याने वासुदेवाला टोमणा मारलाच.. वासुदेवा कार्यकत्र्यासारखे वा:याची दिशा ओळखत चला.. कुठल्या पक्षाची चलती, कुठल्या उमेदवाराची हवा आणि कोण मालदार उमेदवार हे पाहूनच दान मागण्यासाठी जागा निश्चित करा.. मग पहा तुमच्या झोळीत दुप्पट दान पडते की नाही.. त्यावर वासुदेवानेही सहमती दर्शवीत तेथून पुढील दुकानाकडे दान मागण्यासाठी सरकला.. -वासुदेव
Vidhan Sabha 2019 : आला वासुदेव.. : कुणाचे सुगीचे दिवस तर कुणाला कार्यकत्र्याचा शोध..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:12 IST