लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुक कार्यक्रमांतर्गत माघारीच्या अंतिम मुदतीत आठपैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तीन उमेदवार रिंगणात आहेत़ यात युती आणि आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े एमआयएम पुरस्कृत उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढणार आह़े अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता़ अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी सुरु झालेल्या प्रक्रियेत शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्ष पुरस्कृत आठ महिलांनी अर्ज दाखल केले होत़े माघारीच्या अंतिम मुदतीत भाजप-सेना युती पुरस्कृत माजी पंचायत समिती सदस्य वनमाला गंगाराम पाडवी, र}ाबाई अमरसिंग वळवी, कविताबाई ईश्वर वळवी यांनी तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत कौशल्या नरेश वसावे, मथुराबाई सुरेश वसावे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल़े यामुळे भाजप व शिवसेना युती पुरस्कृत उषाबाई प्रवीण बोरा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सुशिलाबाई गेमु वळवी आणि व एमआयमएम पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेश्वरी इंद्रवदन वळवी यांचे अर्ज शिल्लक राहिल़े यात आघाडी आणि युती असा थेटच मुकाबला या निवडणूकीत असल्याचे दुपारनंतर अक्कलकुवा शहरात सुरु झालेल्या प्रचारावरुन दिसून येत होत़े सोशल मिडीयातून उमेदवारांचा प्रचार करण्यावर सर्वाधिक भर देण्यात येत होता़प्रथमच एमआयएमने उमेदवार दिल्याने चर्चाना उधाण आले आह़े शहरात सुरु झालेल्या सरपंचपदाच्या निवडणूकीला विधानसभेची पूर्वतयारी मानली जात असल्याने नेते झपाटून कामाला लागल्याचे दिसून आले आह़े उषाबाई बोरा यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होत़े पहिल्या लोकनियुक्त सरपंच पदाचा मान मिळणा:या बोरा यांना अतिक्रमण प्रकरणामुळे पायउतर व्हावे लागले होत़े आता त्या पुन्हा रिंगणात असल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील अव्वल कारकून उत्तम वाघ यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी जी. डी. साखरे यांनी काम पाहिल़े
अक्कलकुव्यात युती आणि आघाडीत सरळ लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:10 IST