शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुका हगणदारी मुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 12:38 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 9 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यात आज अखेरीस 37 हजार घरांमध्ये शौचालयांची उभारणी झाली आह़े दुर्गम आणि अती दुर्गम भागात घरोघरी स्वच्छ अभियान पोहोचवण्यात प्रशासनाला यंदाच्या वर्षात 100 टक्के यश आले आह़े तालुक्यातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीसह दारिद्रय़ रेषेवरील  लाभार्थी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 9 : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यात आज अखेरीस 37 हजार घरांमध्ये शौचालयांची उभारणी झाली आह़े दुर्गम आणि अती दुर्गम भागात घरोघरी स्वच्छ अभियान पोहोचवण्यात प्रशासनाला यंदाच्या वर्षात 100 टक्के यश आले आह़े तालुक्यातील दारिद्रय़ रेषेखालील लाभार्थीसह दारिद्रय़ रेषेवरील  लाभार्थी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, भूमिहीन मजूर, शारिरिकदृष्टय़ा अपंग कुटुंब प्रमुख, महिला कुटुंब प्रमुख  यागटातील लाभार्थीनी 2013-14 या वर्षापासून शासनाच्या योजनांमध्ये सहभाग नोंदवल्याने तालुक्यात घरोघरी शौचालये उपलब्ध होऊ शकले आहेत़ तालुक्यात पायाभूत सर्वेक्षणानुसार पत्र लाभार्थीनी वैयक्तिक शौचालय बांधकाम करून वापर करत असल्यावर त्यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजने अंतर्गत 12 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस अनुदान देण्यात आले आहे. तसेच रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जॉबकार्ड असणा:या कुटुंबाला देखील 12 हजार रुपये बक्षीस अनुदान देण्यात आले आह़े योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनात सुरु असून तालुक्यात पूर्ण झालेल्या शौचालयांची पाहणी उप मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ सारिका बारी आणि गट विकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांनी केली़ शौचालय पूर्ण करणा:या पात्र लाभार्थींना बँक खात्यावर अनुदान देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़ेतालुक्यात अक्कलकुवा, अलीविहिर, भाबलपूर, भगदरी, भांग्रापाणी, बिजरीगव्हाण, ब्राrाणगाव, डाब, डनेल, डेब्रामाळ, देवमोगरा, गंगापूर, गव्हाळी, घंटाणी, होराफळी, जमाना, कडवामहू, काकडखुंट, काठी, खापर, खटवाणी, कोराई, कुकडीपादर, मेवास अंकुशविहिर, मालपाडा, मणिबेली, मोग्रा, मोलगी, मोरांबा, नाला, ओहवा, पेचरीदेव, पिंपळखुटा, पोरांबी, रायसिंगपूर, साकळीउमर, सिंदुरी, सिंगपूर, सोरापाडा, तालंबा, ठाणविहिर, उदेपूर, उमरागव्हाण, वेली, विरपूर, वडफळी, वाण्याविहिर या 48 गटात सव्रेक्षण झाले होत़े 100 टक्के शौचालय बांधकामाचे उद्दीष्टय़ पूर्ण झाल्याने येत्या काही दिवसात अक्कलकुवा तालुका हगणदारीमुक्त घोषणा होण्याची शक्यता आह़े यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयालयातील अधिकारी वेळोवेळी तालुक्यात भेटी देत आहेत़ दुर्गम भागातील पिंपळखुटा गटात 1 हजार 38, सिंदुरी 1 हजार 57, साकलीउमर 747, वेली 1 हजार 96, उमरागव्हाण 1 हजार 246, कुकडीपादर 483, मोलगी 1 हजार 881, तर मणिबेली गटात 434 घरांमध्ये शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत़ याठिकाणी लाभार्थीनी वेळावेळी पाठपुरावा करून शौचालये बांधून घेतली आहेत़  तालुक्यात 1 हजार 881 शौचालये मोग्रा गटात बांधण्यात आली आहेत़