शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा व खापर कडकडीत बंद : आदिवासी संघटना व शिवसेनेने केले होते आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा/खापर : नवोदय विद्यालयातील दहावीची विद्यार्थीनी जागृती पावरा हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी अक्कलकुवा व खापर येथे शनिवारी बंद पाळण्यात आला. दोन्ही ठिकाणी 100 टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी व आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा/खापर : नवोदय विद्यालयातील दहावीची विद्यार्थीनी जागृती पावरा हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी अक्कलकुवा व खापर येथे शनिवारी बंद पाळण्यात आला. दोन्ही ठिकाणी 100 टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी व आदिवासी महासंघाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अक्कलकुवा बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. बंदच्या हाकेला साद देत अक्कलकुवा, खापरसह परिसरातील व्यापा:यांकडून सदर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवनेरी चौक, मुख्य बाजारपेठ ,भाजी मार्केट, आमलीबारी रोड, तळोदा नाका, फेमस चौक, ङोंडा चौक परदेशी गल्ली, बस स्टेशन परिसर तसेच संपुर्ण  शहरातील व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग घेतला.  बंदमुळे सकाळी कामानिमित्त आलेल्या खेडय़ापाडय़ातील आदिवासी  बांधवांची तसेच फेरिवाल्यांची गैरसोय झाली मात्र त्यांना बंदची माहिती मिळताच तेही आपल्या गावी माघारी गेले.नवोदय विद्यालयाचे प्रशासकीय प्रमुखांसह  घटनेला जबाबदार असुन त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच घटनेतील जबाबदार कर्मचा-यावर कडक शासन करावे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी राज्यपालाना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी , डॉ. विक्रांत मोरे, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी युवा जिल्हाधिकारी विनोद वळवी, गिरधर पाडवी, राजेंद्र पाडवी अल्पसंख्यांक शिवसेना तालुका प्रमुख आशिफ मक्राणी, शहर प्रमुख शाकिब पठाण तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खापरलाही कडकडीत बंदखापर येथेही सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. गावातील बाजारपेठ, बसस्थानक परिसातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परिणामी सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पंचक्रोशीतून आलेल्यांचे यामुळे मोठे हाल झाले. बंदचे आवाहन आदिवासी महासंघातर्फे करण्यात आले होते.