शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा आगारास दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील रस्ते तुटले. परिणामी अक्कलकुवा आगारामार्फत त्या भागातील 40 बसफे:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील रस्ते तुटले. परिणामी अक्कलकुवा आगारामार्फत त्या भागातील 40 बसफे:या बंद  करण्यात आल्या. तीन महिन्यांपासून बस बंदच आहे, यातून आगाराचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.धडगाव व मोलगी परिसरातील वाहतुक सुविधेत प्रामुख्याने अक्कलकुवा आगाराच्याच बसेस अधिक होत्या. या आगारामार्फत एका दिवसात मोलगी, धडगाव, जमाना, भगदरी, बिजरीगव्हाण, कोठली व असली यासह विविध ठिकाणी बस सोडण्यात येत होत्या. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी संपूर्ण रस्ता तुटला व दरडी कोसळल्या. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील वाहतुक सेवा बंद करण्यात आली होती. त्यात परिवहन महामंडळाच्या बसेसचा देखील समावेश होता. सद्यस्थितीत काही अंशी रस्ता दुरुस्त झाला असला तरी बसच्या वाहतुकीसाठी हा रस्ता योग्य नाही. त्यामुळे अक्कलकुवा आगाराच्या या भागातील 40 बसफे:या तीन महिन्यांपासून बंदच आहेत. आगाराला एका बसफेरीतून सरासरी चार हजाराचे उत्पन्न मिळत होते. तर 40 बसफेरीच्या माध्यमातून एक लाख 60 हजाराचे दैनंदिन नुकसान होत आहे. बसफे:या बंद होऊन आज तीन महिन्याच्या कालावधी होत आला आहे. त्यामुळे या कालावधीत आगाराचे दीड   कोटींचे नुकसान झाल्याचे अक्कलकुवा आगार व्यवस्थापनामार्फत सांगण्यात आले. हा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असले तरी बस सुरु करण्यासाठी कदाचित वर्षही उलटू शकते. त्यामुळे पुन्हा नुकसानीचा टक्का वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढते, वाढत्या गर्दीमुळे सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या कालावधीत प्रत्येक प्रवाशाला नियोजित ठिकाणी सुखरुप पोहोचता यावे, यासाठी प्रत्येक एसटी आगारामार्फत ज्यादा बसेस सोडल्या जातात. त्यातून त्या-त्या आगाराच्या उत्पन्नात वाढ होते. दिवाळीच्या हंगामात अक्कलकुवा आगाराला उत्पन्न मिळत असले तरी दिवाळीनिमित्त भरणारी एकमेव अस्तंबा यात्रेला जाणा:या भाविकांसाठी आगाराला बसेस सोडता आल्या नाही. त्यामुळे आगाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

दिवाळीनिमित्त धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे एकमेव यात्रा भरत असते. एकमेव यात्रेमुळे अस्तंबा येथे जाणा:या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे अक्कलकुवा आगारामार्फत या यात्रेसाठीच दरवर्षी वाढीव बसेस सोडल्या जातात. त्यातून आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होते, शिवाय भाविकांची देखील सोय होत असते. परंतु यंदा रस्ताच खराब झाल्यामुळे अस्तंबा भागातील बसफे:या बंद करण्यात आल्या असून यातून मिळणारे मोठे उत्पन्नही आगाराला सहन करावे लागत आहे.