नंदुरबार : शनिवारी असलेल्या सिंधी बांधवाच्या ‘चेट्री चंड’ उत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे़ सिंधी बांधवांसाठी अतिशय मंगल असलेल्या या सणाची जय्यत तयारी करण्यात आली असून यानिमित्त भगवान झुलेलाल यांचा जयघोष करीत सकाळी झेंडावंदनासह विविध धार्मिक कार्यांनी हा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ समाज बांधव अशोक वलेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़सिंधी बांधवांसाठी चेट्री चंड हा सण महत्वाचा मानला जात असतो़ देशातील कान्याकोपऱ्यातील सिंधी बांधवांकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जात असतो़ भगवान झुलेलाल हे सिंधी बांधवांचे इष्टदैवत असून पाण्याच्या मत्स्यावर त्यांची सवारी असते़ झुलेलाल यांना जलदेवता, वरुणदेवता इ़ नावाने संबोधतात़ प्रतिवर्षी चेट्री चंड सणानिमित्त भगवान झुलेलाल महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येत असते़ यासाठी एक विशिष्ठ प्रकारचा लाकडी किंवा लोखंडी पिंजरा तयार केला जात असतो़ त्या पिंजऱ्यात झुलेलाल महाराज यांची मुर्ती ठेवली जात असते़ मुर्तीसमोर पिठाचा पाचवाती दिवा लावतात़ त्याला ‘बहराणो’ असे म्हटले जात असते़ शहरभर बहराणोची मिरवणूक काढली जाते़ पालखीबरोबरच सिंधी बांधव नाचत-गात उत्साहाने टिपºया खेळत नदी किंवा तलावाकाठी येतात़ या नृत्याला ‘छेज’ असे म्हटले जाते़ नदीकाठावर आल्यावर भगवान झुलेलाल यांच्या मुर्तीची पुजा केली जाते़ पुजेनंतर प्रज्वलित ज्योत प्रवाहित केली जाते़ त्या वेळी आयो लाल, झुलेलाल असा जयघोष करण्यात येतो़नववर्षाची सुरुवातचेट्री चंड सणानिमित्त सिंधी बांधव सकाळी स्रानसंध्या आटोपून नवे कपडे परिधान करीत असतात़ समाजात उद्योग-व्यवसायाला अधिक प्राधान्य असल्याने या सणानिमित्त सिंधी बांधवांकडून आपआपल्या आस्थापनांची पुजा-अर्चा करण्यात येत असते़ काहींकडून धार्मिक पुजा-पाठदेखील करण्यात येत असतात़ भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात येत असते़ या सणापासून सिंधी बांधवांचीही नवीन वर्षाची सुरुवात होत असते़ येणारे नवीन वर्ष सुखसमृध्दीचे जावे म्हणून सिंधी बांधव मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी पार पाडत असतात़ बºयाच सिंधी बांधवांकडून यानिमित्त उपवासही करण्यात येत असतो़ चेट्री चंड सणानिमित्त भाविकांकडून गोडभातासह अनेक गोडधोड पदार्थ करुन त्याचा नैवेद्या भगवान झुलेलाल यांना दाखविण्यात येत असतो़ एका अख्यायिकेनुसार सायंकाळी सिंधी बांधव नदी, तलाव काठी जात जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात तांदूळ व साखर टाकत असत़ त्याला ‘अखो’ असे म्हणले जाते़ एकवाती ज्योत प्रल्वलित करुन टाळ्या वाजवत एका विशिष्ट प्रकारचे काव्यगायन केले जाते़ तलाव, नदी नसेल तर एखाद्या पाण्याच्या स्त्रोताजवळ बसून विधी पूर्ण करण्यात येत असे़ चेट्री चंड म्हणजे सिंध्यत दिवस म्हणूनदेखील ओळखला जात असतो़ हा दिवस प्रेम, सलोखा व एकतेचा दिवस समजला जात असतो़ या दिवशी सिंधी बांधव, सिंधी लोकगीते, सिंधी नृत्य, सिंधी कविता गायन करुन आपल्या भाषेत साहित्य, संस्कृतीला सतत सजीव ठेवण्याचा संकल्प करीत असतात़
आयो लाल, झुलेलालचा होणार जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:25 IST