शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाचा शेतीशाळा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यास सेंद्रीय शेतीची जोड देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने यंदापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यास सेंद्रीय शेतीची जोड देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने यंदापासून शेतीशाळा हा उपक्रम हाती घेतला असून, तळोदा तालुक्यात 21 गावांना या शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गणेश बुधावल येथील शेतक:यांना या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतक:यांच्या उत्पादनावर होणारा प्रचंड खर्च कमी करून त्यांना अधिक उत्पादनाबरोबरच सेंद्रीय शेतीची जोड व्हावी यासाठी संपूर्ण राज्यात यंदा शेतीशाळा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमातून प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून शेतक:यांना पीक व कीड व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहे. तळोदा तालुक्यातील कोठार, गणेश बुधावल, सोमावल नर्मदानगर, ङिारी, सरदारनगर, खुषगव्हाण, सेलवाई, रांझणी, रेवानगर, गोपाळपूर पुनर्वसन,  रापापूर, बोरद, लाखापूर (फॉ), धनपूर, धानोरा, त:हावद, दलेलपूर या गावांची येथील कृषी विभागाने निवड केली आहे. या शेतीशाळेसाठी प्रत्येक गावातील 25 शेतक:यांचा गट तयार करण्यात आला आहे. ऊस, कापूस, मका, सोयाबीन, तूर ही पिके या कार्यक्रमासाठी घेण्यात आली आहे.शेती क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून शेतक:यांना शेती शाळेचे नियोजन, पीक प्रात्यक्षिक, नांगरटीपासून तर पीक काढणीर्पयत मार्गदर्शन करणार आहेत. अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन यावर प्रमुख भर राहणार आहे. वर्षभरात एकूण आठ मार्गदर्शन वर्ग प्रत्येक गावात घेण्यात येतील. त्यात उसासाठी दोन, कापूस 12, मुंग दोन, सोयाबीन दोन, तूर एक अशा एकूण 19 शेती शाळा घेण्यात येणार आहेत. 15 दिवसांच्या कालावधीमध्ये एक मार्गदर्शन वर्ग घेण्यात येईल. कृषी विभागाच्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी येथील कृषी कार्यालयाकडून हाती घेण्यात आली असून, तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथील शेतक:यांना तीन दिवसांपूर्वीच मार्गदर्शन करण्यात आले आहे. पिकांबाबत अधिका:यांकडून सखोल मार्गदर्शन मिळत असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. साधारण 25 शेतक:यांच्या गटाची मर्यादा असली तरी मोठय़ा प्रमाणात शेतकरी मार्गदर्शन वर्गात उत्साहाने सहभागी होत असल्याचे तळोदा कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

शेती शाळेच्या कार्यक्रमासाठी कृषी विभागाने अनुदानदेखील उपलब्ध करून दिल आहे. प्रत्येक शाळेसाठी साधारण 14 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानातून तालुका कृषी प्रशासनाने सहभागी शेतक:यांना अल्पोपहार, कीडरोग व्यवस्थापन माहिती पुस्तिका व इतर सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. याशिवाय बाहेरील कृषी तज्ज्ञाचे मानधनही द्यायचे आहे.