शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा आठ अहवाल पॅाझिटिव्ह, तीन लाख २८ हजार कोंबड्या केल्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस ...

उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक नासिर पठाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे आदी सर्व अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या परिस्थितीची पाहणी करीत माहिती जाणून घेत आहेत. पोल्ट्री परिसरात बंदोबस्तासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

आमदार शिरीषकुमार नाईक यांची पाहणी

आमदार शिरिषकुमार नाईक यांनी बर्ड फ्लू भागातील पालावाला पोल्ट्रीत पाहणी केली किती कुकुट पक्षी आहेत, अंडी किती आहेत, पशुखाद्य किती अशी चौकशी करून नुकसान झालेल्या व्यावसायिकांची समस्या जाणून घेतली. नवापूर शहरातील पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यासंदर्भात विधानसभेत नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल, पशुसंवर्धन मंत्र्याशी चर्चा करून तत्काळ मदत निधीत मिळावी यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार शिरिषकुमार नाईक यांनी दिली.

२७ पोल्ट्री मधील पशुखाद्य गोडाऊन सील

नवापुर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत २७ पोल्ट्रीमधील पशुखाद्याची मोजमाप व पंचनामा करून पशुखाद्य गोडाऊनमध्ये सील करण्याची कामगिरी करण्यात आली आहे. नवापूर शहरातील मोठ्या पोल्ट्रीमध्ये पशुखाद्याची निर्मिती केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पशुखाद्य पोल्ट्री फार्म मध्ये दिसून येत आहे. यात मका, सोयाबीन ढेप, शिंग ढेप, ज्वारी या पासून पोल्ट्री व्यवसायिकांनी आधुनिक मशिनरी च्या सहाय्याने पशुखाद्य तयार केले जाते. व्यवसायिकांनी पशुखाद्य नष्ट न करता त्याला ९० दिवसांपर्यंत सील करून ठेवावे त्यामुळे शासनाचे व व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बुधवारी प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मचे कोंबडी खाद्याचे गोडावून सील केले.

मजुरांची काळजी घ्यावी

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार किलिंग ऑपरेशन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, परंतु काही पोल्ट्रीधारकांनी जेसीपीने खड्डा करत असताना अर्धवट खड्डा करून कोंबड्या पुरवण्याचे काम दिसून येत आहे. काही ठिकाणी खाजगी कामगारांकडून काम केले जात आहे परंतु काहीचा तोंडाला मास्क नसल्याने त्याचा परिणाम मजुरांचा आरोग्यावर होऊ शकतो. याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.