नंदुरबार आगारातून लांब आणि कमी पल्ल्याच्या कोरोना अगोदर २८४ बसफेऱ्या सुरू होत्या सध्या ८४ बस दररोज विविध मार्गांवर २३५ बसफेऱ्या करत आहेत. या बसफेऱ्यामधून दररोज ३५ हजार किलोमीटरपर्यंत बसचा प्रवास होत आहे. सध्या नंदुरबार आगार ११ हजार प्रवाशापर्यंत पोहोचत असून जुलै महिन्यापर्यंत १६ हजार प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्टे आहे. सध्या एस.टी.ला मिळणारा प्रतिसाद कमी असून तो दिवसेंदिवस वाढत असल्याने असून एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहे.
नंदुबार जिल्हा आगार बसफेऱ्या
कोरोना अगोदर फेऱ्या - २८४
शालेय विद्यार्थी फेऱ्या -६४
माणव विकास फेऱ्या - २८
कोरोनानंतर फेऱ्या - ८४
शालेय विद्यार्थी फेऱ्या -००
माणव विकास फेऱ्या - ००
नंदुबार जिल्हा आगार माल वाहतूक
विविध मार्गावर फेऱ्या - ३४
शालेय बसफेऱ्या बंद
सध्या शाळा, विद्यालय व महाविद्यालय बंद असल्याने जिल्हा व तालुका अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना अगोदर आगारातून शालेय ६४ बसफेऱ्या व मानव विकास अंतर्गत २८ बसफेऱ्या सुरू होत्या. सध्या शासन शाळा सुरू करण्याचा विचार करत असून याबाबत अधिकृत घोषणा झाल्यावर सर्व शालेय बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे माहिती
मिळाली आहे.
बस मालवाहतूकला सुगीचे दिवस
एस.टी. महामंडळ तोट्यात चालत असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाने बस मालवाहतूक सेवा राज्यभरात सुरू करण्यात आल्याने चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. त्यात नंदुरबार आगाराच्या ३४ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात ४९०० किलोमीटर आतापर्यंत प्रवास केला असून २ लाख १० हजार उत्पन्न मिळविले आहे. बस मालवाहतूक सुरू झाल्यामुळे भाजीपाला, किराणा, औषधी आदी प्रकारचा मालवाहतूक करण्यात येत असतो.
शासनाने अनऑक जाहीर केल्यानंतर एस.टी. बसला प्रतिसाद वाढत असून सध्या गरज व उत्पन्नानुसार बसफेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात निम्यापेक्षा भागात बस सुरू झाल्या आहेत. उर्वरित भागात लवकरच बससेवा सुरू करण्यात येईल.
- मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार